तर पंकजा मुंडे आसतील पहिली महिला मुख्यमंत्राी -ओबीसी मेळाव्यात मोठं विधान
पंकजा मुंडे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्राी पदावर पाहयच आसेल तर ओबीसीचे 100 आमदार निवडुण द्या

केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड
बीड प्रतिनिधी दि -19.10.24 बीड जिल्ह्यातील चाटगांव येथील आयोजीत केलेल्या ओबीसीच्या पहिल्याच राजकिय मेळाव्यात ओबीसीच्या न्याय हाक्काचे संरक्षण करण्यासाठी उपोषणाचे हात्यार घेऊण संवैधानिक मार्गाने लढा उभा करणारे प्रा.लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील ओबीसीची पुढील भुमीका स्पष्ट केली आहे…
ओबीसीच्या विरोधात मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या भुमीकेला समर्थन देणाऱ्या आमदारांच्या आणि मराठा आंदोलनास आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या तुतारी च्या विरोधात ओबीसी समाज मतदान करणार आसल्याचे यावेळी लक्षमन हाके यांनी स्पष्ट केले आहे…
तर यावेळी बोलताना ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी सांगितले की या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्राी पदावर पंकजा मुंडे यांना पहिली महिला मुख्यमंत्राी म्हणुण पाहयचे असेल तर आपल्याली ओबीसचे 100 आमदार निवडुण आणावे लागतील राज्याचे मुख्यमंत्री पद सांभळण्यासाठी आपल्याकडे सक्षम पर्याय उपलब्ध आसल्याचे ठणकाऊण सांगताना या पदासाठी पंकजा मुंडे यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक आणि चार दशकाचा अनुभव आसणारे 70 वर्षाचे ओबीसी योद्धा आणि ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील वाघमारे यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला….
परंतु पंकजा मुंडे यांच्या नावाने ओबीसीच्या मेळाव्यात ओबीसी नेत्यांकडुण मुख्यमंत्राी पदावर केलेल्या दाव्यामुळे संपुर्ण निवडणुकीत भाजपच्या नेत्यांवर एक प्रकारचा राजकिय दबाव निर्मान होणार आसुण आगोदरच जातीपातीच्या मुद्यावर गेलेल्या निवडणुकी मध्यें मुख्यमंत्राी पदासाठी पंकजा मुंडे यांच्या नावाचा ओबीसी नेत्यांकडुण केलेल्या दाव्यावर भारतीय जनता पक्ष काय भुमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.