मारवाडी समाजाच्या मतांसाठी राजस्थानीच्या ठेविदारांचा राजकिय बळी
ठेवीदारां कडुण मतांची ताकद दाखवुण देण्याचा गर्भित इशारा

मारवाडी समाजाच्या मतांच्या भीतीपोटी परळीतील राजकीय नेत्यांचे राजस्थानी मल्टीस्टेट बद्दल मौन.. आम्ही पण वीस हजार मतदार आहोत, येत्या निवडणुकीत दाखवून देऊ – ठेवीदार कृती समिती
परळी वैजनाथ -केशव मुंडे वेगवान मराठी दि 19.10.2024….
मागील १० महिन्यापासून बंद पडलेली राजस्थानी मल्टी स्टेट ज्यामध्ये हजारो ठेवीदारांच्या ३०० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. याविषयी आपण बोललो तर मारवाडी समाजाची मतं आपल्याला मिळणार नाहीत.या भीतीपोटी परळीतील सर्वच पक्षातील राजकीय नेते मंडळी मूग गिळून गप्प आहेत. आमच्याकडे पण ठेवीदारांची २० हजार मतं असून येत्या निवडणुकीत आम्ही सुद्धा आमच्या मतांची ताकद दाखवून देऊ असे आव्हान ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राजस्थानीच्या चेअरमन सह संचलक मंडळाकडून केल्या गेलेल्या भाष्टाचारात मारवाडी समाज सुद्धा सुटलेला नाही. मारवाडी समाजासह सर्वच समाजाचे करोडो रुपये राजस्थानी मल्टी स्टेट मध्ये अडकले आहेत. रहिमोद्दीन नंबरदार व विमलबाई माने यांचे पैसे राजस्थानी मल्टी स्टेट मध्ये जमा असून दवाखान्याच्या इलाजासाठी वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे या दोघांना जीव गमवावा लागला.
अनेक ठेवीदारांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. अनेक ठेवीदारांचे मनोबल खचले आहे. भानूदास वडमारे नावाचे ठेवीदार अंथरुणात खिळून आहेत. असे अनेक उदाहरण देता येतील.
राजस्थानी आणि ज्ञानराधा मल्टिस्टेट मुळे अनेकांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले आहे. एक पिढी नष्ट झाली म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
बीड जिल्यातील बंद पडलेल्या मल्टी स्टेट पैकी ज्ञानराधा मल्टी स्टेटचे सुरेश कुटे, साईरामचे साईनाथ परभने, जिजाऊ मल्टी स्टेटचे बबन शिंदे यांना अटक होते. मात्र त्यांच्या सोबतच फरार झालेले चंदूलाल बियाणी व संचालक मंडळ का बरं सापडत नसेल ? महाराष्ट्राच्या गृहखात्यापेक्षा हे भगोडे मोठे झाले आहेत का ? यांना कोणाचे अभय, वरदहस्त असेल बरं लोकप्रतिनिधी म्हणुण आमदार राजेश टोपे मा खा इम्तियाझ जलिलभाई यांनी ठेवीदारांची बाजु ज्या तळमळीणे मांडण्याची भुमीका घेतली तशीच भुमीका परळी मतदार संघातील ठेवीदारांसाठी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणुण धनंजय मुंडे का घेत नसतील ? असे अनेक प्रश्न ठेवीदारां समोर उभे राहत आहेत.
परळी मतदार संघात ठेवीदारांचे २० हजार मतं आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सुद्धा आमच्या मतांची ताकद दाखवून देऊ असे आव्हान ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.