बीडमहाराष्ट्रराजकारण
ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे शिवसंग्राम पक्षा कडुण स्वागत
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे घेणार हाती तुतारी

केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड (प्रतिनिधी 20.ऑक्टोंबर 24) स्वर्गीय दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या पत्नी डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते व खासदार सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, मोहिते पाटील यांच्या उपस्थतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या सह महाविकास आघाडीला बीड मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे साहेब यांच्या स्वच्छ प्रतिमा, तज्ञ प्रशासक व विनायकराव मेटे साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा फायदा महविकस आघाडीला होणार आहे डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या प्रवेशामुळे शिवसंग्राम कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे डॉ ज्योतीताई मेटे यांच्या निर्णयाचे शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, रमेश जगताप, कृष्णा मसुरे, संजय तीपाले, शैलेश सुरवसे, मोहन गव्हाणे, विलास शिरसट,सुधाकर काकडे यांच्यासह शिवसंग्राम पक्षा च्या वतीने ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष आसलेल्या ज्योती मेटे यांच्या निर्णयामुळे शिवसंग्रामचा प्रभाव आसलेल्या ठिकाणी महा विकास आघाडीला याचा राज्यभर फायदा होणार आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.