मेटेंच्या ज्योती मुळे क्षीर सागरांचा{सं} दिप काळोखात
बीड मध्ये ज्योती मेटे की संदीप क्षीरसागर?

केशव मुंडे वेगवान मराठी परळी दि 21.10.24-
बीड प्रतिनिधी: –बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवा मुळे केवळ युतीच्याच नाही तर आघाडीच्या नेत्यांचे देखील राजकीय समीकरणाची गणितं कोलमडली आहेत याचा सर्वाधिक फटका युतीच्या नेत्यांना बसला आसला तरी बारामतीच्या करामती मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची देखील चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे…
राष्ट्रवादी पक्षाच्या उभ्या फुटी नंतर संदिप क्षीरसागर वगळता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे बाकी 3 आमदार आणि जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी आजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे ठेवण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बाजी मारली त्यामुळे साहाजिकच बीड जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षाची धुरा जिल्हाध्यक्ष पदासह संदिप क्षीरसागर यांच्या खांद्यांवर आली
त्यानंतर लागलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात बजरंग सोनवणे यांनी प्रवेश घेऊण लोकसभेची उमेदवारी मिळवली या स्पर्धेत होत्या विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्राम पक्षाच्या आध्यक्षा ज्योती मेटे त्यांनी शरद पवार यांची भेट घेत लोकसभेसाठीची उमेदवारी मिळावी म्हणून पवारांना मागणी घातली होती,आसं बोललं जाते की त्याच वेळी पवारांनी ज्योती मेटे यांना थांबायचे सांगत विधानसभेला संधी देण्याचे आश्वासन दिले होते,त्यातच बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेतील विजयचा आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा दुसरा जोरदार फटका बसला तो संदिप क्षीरसागर यांना
काल शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्योती मेटे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे यावरूण एक सिद्ध होत आहे की जर ज्योती मेटे यांना विधानपरीषेदवर घ्यायचे ठरवले आसेल तर त्यांचा स्वतःचा पक्ष सोडुण राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देण्याची गरज नव्हती त्यामुळे बीडच्या चौकलेट बौय च्या तोंडात विधानपरिषदेचा चोकोबार आणि विधानसभेचा नारळ देत पवार काकांनी मेटेंची ज्योती लाऊण क्षिर सागरांचा सं-दिप विझवल्याचे बोलले जात आहे….

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.