बीडमहाराष्ट्रराजकारण

मराठवाडयात प्रथमच या उमेदवाराला मिळणार वोट आणि नोट

The candidate of the depositors is getting support along with votes and notes

केशव मुंडे वेगवान मराठी परळी 

दिनांक 26 आक्टोंबर परळी वैजनाथम –दिनांक 28 सोमवार रोजी गरजवंत ठेवीदार कृती समिती परळी च्या उमेदवारचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे परंतु हे मराठवाड्यातील एकमेब उदाहरण असेल की आंदोलनाचा च एक भाग म्हणून आपला माणूस सभागृहात पाठवण्याच्या करीता ठेवीदारांच्या कालच्या बैठकीत ठेवीदारांनी 200, 500 1000 जसा घडेल तसा लढा निधी ठेवीदारांकडुण स्वयंस्फूर्तीने जमा केला आहे.एवढंच नाही तर गरज पडली तर परत निधी जमा करुण लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

विशेष बाब म्हणजे परळीतील सर्वच स्थानीक नेत्यांनी  ठेवीदारांना वाऱ्यावर सोडत जबाबदारीतुन हात झटकले आसतानां देखील स्वतः च्या बळावर पोटाला चिमटा काडुण ठेवीदारांनी आपला ठेविदारांचा लढा जिवंत ठेवला आहे

आजकाल निवडणुका ह्या पैशाचा उन्माद करत लढवल्या जातात परंतु मल्टिस्टेटचे ठेवीदार या निवडणुकीत गरजवंत म्हणून उतरले आहेत ठेवीदारांच्या या लढ्यात आठरा पगड बारा बलुतेदारांसह सर्व जातीधर्माच्या लोकांचा समावेश आहे

विशेष म्हणजे मराठवाड्यात,खास करून बीड जिल्ह्यात आणि त्यात हि परळी तालुका हा मराठा वंजारी वादाचे केंद्र बिंदु झालेला आसताना देखील या लढ्यातील मराठा आणि वंजारी बांधव मांडीला मांडी लावुण एका ताटात जेवत आहेत यामुळे जनते मध्ये सामाजीक समतेचा आणि बंधुत्वाचा आदर्श आसा संदेश जात आहे याचे देखील सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळींनी स्वागत केले आसुण भुकेल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जातीची नाही तर एकमेकांच्या साथीची गरज आसते ! या घटणेमुळे मानव समाजाचे अंतीम सत्य देखील

समोर आले आहे …

हा लढा कोणा व्यकती विरोधात प्रेरित नसुण किंवा एखाद्या जातसमुहाच्या विरोधात उभा केलेला नसुन हा लढा गरजवंत ठेवीदारांच्या कष्टाच्या ठेवी स्वाभिमानाने परत मिळविण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊण उभा केलेला आहे त्यामुळे या लढ्यात परळी मतदार संघातील मायबाप जनतेनी देखील आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी द्यावेत आसे आव्हाण ठेवीदार कृती समितीच्या वतिने तमाम परळी मतदार संघातील जनतेला करण्यात आले आहे

candidate of the depositors is getting support along with votes and notes

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!