कौग्रेस पक्षाच्या मराठा नेत्याचे मुंडे साहेबांना उद्देशुण अनाहुत पत्र
A Maratha Worker's Letter to Munde Saheb

केशव मुंडे वेगवान मराठी परळी दि -27 ऑक्टोबर –बीड जिल्हातील माजलगाव येथील कांग्रेसचे नेते हरीभाऊ सोळंके यांनी बीडसह परळीतील भाजपच्या दयनीय अवस्थे बद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गलथान कार्यप्रणाली वर सडेतोड शब्दात केलेले भाष्य हे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या डोळ्यात पाणी आणनारे तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात आंजन घालणारं आहे….👇
आदरणीय मुंडे साहेब तुम्हाला माझे एक अनावर्तपत्र तुमच्या परळीतून भाजप हद्दपार झाली.
मुंडे साहेब परळी तालुक्यातील नाथा या गावातून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आपण जन्माला आलात आंबेजोगाईला शिकत असताना तुम्ही तुमचे मित्र प्रमोद महाजन यांच्या सानिध्यात येऊन तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजकीय युवक शाखेत सामील झालात.
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतून राजकीय चळवळीत भाग घेत असताना तुम्ही प्रमोद महाजन चे मेव्हणे झालात.
पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीतून यशस्वी झाल्यावर 1980 च्या विधानसभा निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी कडून तुम्ही आमदार झालात . त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीची धुरा खांद्यावर घेऊन , मारवाडी व वाण्या ,बामणाचा असलेला पक्ष गोरगरिबाच्या झोपडपट्टीत नेण्याचं काम यशस्वीपणे केलं .
विरोधी पक्ष नेता असताना यशस्वी काम केल्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलात जे भाजपसाठी कधी शक्य नव्हतं ते तुमच्यामुळे घडले.
1980 ला परळीत पहिल्यांदा कमल फुलले त्यानंतर जिल्ह्यात एकेक काळा असा होता भाजपचे पाच आमदार असत. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई सोडली तर भाजपचे चिन्ह हद्दपार झालेले आहे.
मुंडे साहेब तुम्ही भाजप वाढवत असताना तुम्ही पोलिसांच्या लाट्या खाट्या खाल्ल्या प्रसंगी अनेक वेळा जेलमध्ये गेलात.
तुमच्या भागीरथ प्रयत्नाने परळी बरोबरच महाराष्ट्रात भाजपचे चिन्ह गोरगरीबाच्या घरोघरी पोहोचले व लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळेच तुम्ही उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलात ,त्यानंतर केंद्रीय मंत्री पदापर्यंत आपण यशस्वी वाटचाल केली.
कठीण प्रसंगातून महाराष्ट्रात तुम्ही वाढवलेल्या भाजप आज 2014 पासून कट्टर मनुवादी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गेलेला आह. त्यांनी तुम्ही निर्माण केलेल्या भाजपची वाट लावलेली आहे.
जाती-जातीत भांडणे लावुन फडणवीस भाजप सत्तेवर येण्याची स्वप्न पाहत आहेत. परंतु त्यांनी तुमचा विचार सोडला म्हणून भाजप आज बीड जिल्ह्यातून हद्दपार झालेली आहे.
तुम्ही आयुष्य बहुजनासाठी घालवले फडणवीस मोदी आणि शहा यांच्याकडे फक्त पैसा कमवून देणाऱ्या दलाची संख्येने ते व त्यांचा तुम्ही घडवलेल्या भाजपच्या विचाराशी काही संबंध नाही. हे सगळं तुम्ही वरून पाहत असताना नक्कीच तुम्हाला वेदना होत असतील हे मात्र नक्की.
असो तुमची भाजप देवेंद्र फडणवीस मोदी शहा यांनी दलालाच्या हातात दिलेली आहे. काँग्रेसमुक्त भाजपचे स्वप्न पाहणारे आज भाजप मुक्त देश करीत आहेत .याच्या वेदना तुम्हाला नक्कीच वरी होत असतील.
A Maratha Worker’s Letter to Munde Saheb

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.