जागा वाटपात ठरले दोन्ही पवार छोटेमिया
Both the Pawars were short-changed in the seat allocation

केशव मुंडे वेगवान मराठी परळी { दि २९ ऑक्टोंबर} –महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला —
आघाडी आणि युती मध्ये मागील पंधरा दिवसां पासुण जागा वाटपा संदर्भात सुरु आसलेली खिंचाताणी शेवटच्या क्षणापर्यंत चालु होती काही मतदार संघातील एबी फौर्म तर अगदी शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टर्स मधुन पोहचविण्यात आल्याचे पाहायला मिळाले….
आघाडीतील युबीटी सेना आणि कांग्रेस मधिल जागावाटपातील वाद शिगेला पोहचला होता तर युती मधिल शिंदेसेना आणि आजित दादा गटात ओढातानी देखील चर्चेचा विषय बनला होता परंतु अमित शहांच्या डरकाळी पुढे शिंदे आणि पवारांनी नांगी टाकलेली पाहायला मिळाली
शेवटी बारामतीच्या दोन्ही पवारांना तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आघाडी आणि युतीला यश आले असुण आघाडीत थोरले पवार धाकटे झाले तर युतीमध्ये भाजपाने धाकट्या पवारांची दादागिरी संपुष्ठात आणली असुण आघाडी आणि युतीने दोन्ही पवारांना छोटेमियां बनवले आहे 👇
🔜 भाजपा-148 -शिंदेसेना -85 -एण सि पी दादा गट -51 -मित्र पक्ष-4- 🔜 आघाडी -कांग्रेस -102- ठाकरेसेना -96-पवार गट-87-इतर- 8 -🔙

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.