बीडमहाराष्ट्रराजकारण

परळीच्या निवडणुकिचे गणित ठेविदारांचे उमेदवार बिघडवणार

ठेवीदारांचे मराठा वंजारी समीकरण परळी मतदार संघात निर्णायक ठरणार

केशव मुंडे वेगवान मराठी दि 28 ऑक्टोबर 

परळी प्रतिनिधी: –यावेळी परळी विधानसभा मतदार संघातील जनता परिवर्तानाच्या भुमिकेत आलेली पाहायला मिळत आहे मागील अनेक वर्षा पासुण आणि परळी मतदार संघाची निर्मिती झाल्यापासुण परळीचा लोकप्रतिनिधी म्हणुण गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्या व्यतीरीक्त कोणीही विजय प्राप्त करु शकलेले नाही आणि त्याला कारण हि तसेच होते गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनातील भाव ओळखत आणि विकासा बरोबरच मतदार संघातील जनतेच्या व्यकतीगत आडी आडचणी सोडवत आसायाचे या बरोबरच त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडुण आत येणाऱ्या विरोधकास देखील सन्मानाची वागणुक देत होते तसेच दारात आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याची योग्य भुमीका घेऊण लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे या सारख्या कारणांमुळे परळीतील जनतेच्या मनाला आणि मेंदुला इतर उमेदवाराचा विचार करण्याची कल्पना स्पर्श देखील करु शकली नव्हती !

परंतु मागील पाच वर्षाच्या काळात परळी मतदार संघात अन्याय आत्यायाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याच बरोबर विकासाची गती मंदावली आहे.सामान्य नागरीक,असो की उच्चभ्रु जनता मध्यम वर्गीय असो कि व्यापारी वर्ग असो सर्वजनच लोकप्रतिनिधीच्या कार्यपद्धतीवर नाराज आसल्याचे स्पष्ट झाले आहे

काही मोजक्या 40 ते 50 ठराविक लोकांना लाभार्थी बनवुण चालविलेल्या जुलमी राजवटीला मतदार संघातील जनता आता पुरती कंटाळली आहे..

अलीकडेच आरक्षणाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडयात निर्मान झालेल्या जातीवादा मुळे मतदार संघातील सामाजिक दरी वाढली आहे याचा फायदा घेऊण आपला नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे विकासाच्या पातळीवर स्पेशल अपयशी ठरलेले पालकमंत्री मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडुण घोटाळेबाज,चोर,लफंगे,आणि गुंडागर्दी करणाऱ्या मुठभर लोकांच्या हिताचे रक्षण करण्यास प्राधाण्य देत धन्यता मानत आहेत ..

त्यामुळे ज्यांनी 2019 ला मोठ्या अपेक्षेणे निवडुण दिले तेच मतदार आज मनस्ताप करुण घेत आहेत लोकांमध्ये मतं मागण्यासाठी ठोस मुद्दे नसल्याने जातीपातीवर प्रचाराचा भर देण्यात येत आहे हि एक शोकांतीका आहे

अमावस्या पौर्णिमेला शाळेत येणारा विद्यार्थी ज्याप्रमाणे परिक्षेच्या काळात अभ्यासाला बसतो,अभ्यास करुण जातो इंग्रजी विषयाचा आणि प्रश्न पत्रिका गणिताची पाहुण भांबावतो तशीच गत यावेळी प्रमुख राजकिय पक्षांच्या उमेदवारांची परळी मतदार संघात होणार असुण जातीचा मुद्दा बाजुला जाऊण परळी मतदार संघातील ठेवीदारांचा पेपर उमेदवारांना निवडणुकीच्या परिक्षे मध्ये सोडवावा लागणार आहे

या मतदार संघातील 5 हजार ठेवीदार पतसंस्थेच्या प्रकरणात प्रभावीत झाले आहेत एका ठेवीदाराच्या कुटुंबातील 5 मतदान धरले तरी 5 × 5000 = 25000 मतं एकगठ्ठा राहणार आहेत त्यामुळे या निवडणुकित परळी च्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला सभाग्रहात जाणयासाठीचा मार्ग ठेवीदारांच्या दारातुनच शोधावा लागणार असुण ठेवीदार कृती समितीने उभे केलेले दोन अपक्ष उमेदवार सेवकराम जाधव (मराठा) आणि पत्रकार केशव मुंडे (वंजारी) कृती समितीने विचारपुर्वक निवडले आहेत

एकतर सध्याच्या वातावरणात जाती जाती मध्ये विसत्व आडवा जात नसताना परळी सारख्या अतिसंवेदनशिल मतदार संघात मराठा आणि वंजारी बांधव मांडीला मांडी आणि खांद्याला खांधा लावुण एकत्र लढा देत आहेत तर त्यांच्या समर्थनार्थ आठरा पगड बारा बलुतेदारांसह दलित मुस्लिम बांधव आणि m i m चे तालुकाप्रमुख शरीफ भाई यांनी देखील ठेविदार कृती समिती च्या उमेदवारांना बिनशर्त जाहीर पाठींबा दिला आहे त्यामुळे कृतीसमीतीच्या उमेदवारांना जनतेचा वाढता पाठींबा बघता घडी,तुतारी,आणि प्रस्थापित अपक्ष उमेदवारांचे राजकिय गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

:— परळी मतदार संघातील इतर प्रमुख प्रश्न आणि ठळक मुद्दे:–

1) तुमच्या डोळ्या देखत तुमचा सहकारी चंदु बियानी भर दिवसा तुमच्याच प्रजेच्या डोक्यात दगड घालतो आणि तुम्ही त्या प्रजेला न्याय देण्या ऐवजी गुन्हेगाराल असरा देताय आसला प्रजेचा राजा कसा काय असु शकतो..

2:– परळी मतदार संघात शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्यात दाखविलेल्या उदासिणतेमुळे विद्यार्थी परळी बाहेर पुणे मुंबई लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवावे लागतात परंतु पालकांना,त्या साठी आधिकचे पैसे मोजावे लागतात आणि याचा दुष्परीणाम पालकांसह विद्यार्थ्यांच्या जिवनमानावर होतो हे कधी समजणार ?

.3) परळी थर्मल पावर स्टेशनच्या प्रदूषणाच्या प्रश्नामुळे नागरीकांचे जिवनमान धोक्यात आले आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनी पडिक पडल्या आहेत यावर उपाय कधी शोधणार आहात ?

4) परळी मतदार संघातील शेतकरी पीक विम्याचा प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश आणि पीक पाहणी केल्यावरच पीक विमा मिळतो आशा जाचक अटी लावुण शेतकऱ्यांना लाभा पासुण वंचित ठेवायला जबाबदार कोण ?

सारडगांव येथील लिंबुनी फळबागायतदारांचा मंजुर झालेला विमा कुठे गेला ? ज्यांच्याकडे अँड्रॉइड फ़ोन नाही जे शेतकरी अशिक्षित आहेत त्यांचे काय?

5) परळीतील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न कधी सुटणार अजून MIDC नाही फक्त घोषणा मग 10 वर्षात आपण काय केलें

6)अवैध दारू, मटका, वाळू माफीया या सर्व गोष्टी याला कोणाचे अभय,

चंदुलाल बियानी च्या पतसंस्थेचा आणि तुम्ही ठेवलेल्या ठेवींशी माझा काय संबंध म्हणुण ठेवीदारांना संवेदनाहीन उत्तर देऊण कर्त्व्यापासुण पळ काढलता खरा पण मग तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष असलेल्या  जगमित्र कारखाना, सुतगिरणी,वैधनाथ कारखाण्यात थक्कीत असलेल्या शेतकरी, कर्मचारी,आणि यावर संबधीत आसलेल्या व्यवसायीकांच्या थकलेल्या कोट्यावधीच्या आर्थिक व्यवहाराशी कोणाचा संबध आहे त्याच काय ?

7:–परळीच्या बसस्थानकावर आपण कधी जाऊण बघितलयं का ?

8:–2019 च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना वचन दिले होते पाच वर्षाच्या आत तुमचे उत्पन्न डबल करतो म्हणुण यावर कधी बोलणार आहात…

9:–सपना चौधरी,रश्मिका मंधना,चला हवा येऊ द्या,आशा विषयांवर उधळपटी करुण तुमच्या मते काय मिळाले असेल परळीकरांना.?

10:–तरुणांना वाढदिवसाचे फटाके देणे,गणेश मंडळांना आर्थिक बळ देणे,सगळ्या परळीत बारा महिणे बैनरबाजी करणे,उठसुठ जेसीबीने फुलं उधळणे,वर्षातुन 4 ते 5 वेळा मोठे मोठे कार्यक्रम घेणे,सामान्य माणसांच्या चालर चिल्लर वादासाठी खरं खोटं न पाहता वादी किंवा प्रतिवादी समर्थक आहे म्हणुण प्रशासणास वेठीस धरणे,खोटं पण रेटुण बोलणे,हि जर तुमची विकासाची आणि डब्बल उत्पन्नाची व्याख्या असेल  तर ति तुम्हालाच लखलाभ असो  जनतेला नकोय तुमचा विकास.

कारण यामुळे परळी मध्ये गुन्हेगारी,आणि दादागिरी वाढत चालली आहे भरदिवसा मुडदे पडत आहेत यासह इतर अनेक प्रश्न परळी मतदार संघातील मतदारांच्या मनात अनुत्तरीत आहेत…

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!