
केशव मुंडे वेगवान मराठी परळी वैजनाथ बीड
परळी वैजनाथ दि-१३ नोव्हेंबर -एक काळ होता बीड जिल्ह्यात भाजपचा तोता पण बोलत होता परन्तु भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात् बीड तर सोडा पण मुंडे साहेब यांच्या होमपीच राहीलेल्या आणि सलग प्रतिनिधित्व केलेल्या 233 क्र.परळी विधानसभा मतदार संघातून भाजपचे कमळ संपुष्टात आले आहे तर गोपीनाथ मुंडे,भाजपा,आणि पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या मतदारांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील नाईलाजाने राष्ट्वादी कांग्रेसचे गमजे गळ्यात आणि झेंडे हातात घेऊण फिरण्याची नामुष्की ओढावली आहे…
20 नोव्हेंबर ला मतदान होणार आहे 23 नोव्हेंबर ला टिपीएस कौलनी उर्जा नगर या ठिकाणी मतमोजनी होणार आहे,या मतदार संघात एकुण 3 लाख 35 955 एवढी मतदारांची संख्या आहे,यामध्यें पुरुष 1 लाख 75 हजार 184 तर महिला मतदार 1 लाख 60 हजार 766 व इतर 4
परळी शहर मतदार संख्या 83 हजार 233 एवढी आसुण यामध्यें पुरुष 43 हजार 41 आणि महिला 40 हजार 189 इतर 3,परळी तालुक्याचा विचार केला तर 2 लाख 37 हजार 583 मतदार आहेत यांमध्यें पुरुष 1 लाख 23 हजार 806 तर महिला मतदार 1 लाख 13 हजार 773 एवढी आहे, परळी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील मतदारांची संख्या हि 98 हजार 371 इतकी आहे यामध्यें 51 हजार 378 पुरुष तर 46 हजार 993 महिला मतदारांची संख्या आहे…
परळी मतदार संघात मतदान केंद्रांची एकुण संख्या 363 एवढी आसुण 88 परळी शहर 258 परळी तालुका तर 105 अंबाजोगाई तालुक्यातील आहेत 12 संवेदनशील मतदान केंद्र आसान या निवडणूक कार्यक्रमासाठी 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे
तसं पाहीले तर पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे यांनी गतवेळी विजय संपादन केला होता त्या विजयाचे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे विश्लेष्ण करत बसले तर एक ग्रंथ तयार होऊ शकतो तो विषय सोडा परन्तु मागील दोन वर्षांमध्ये ज्या राजकिय घडामोडी घडल्या त्या घडामोडी मध्यें धनंजय मुंडे यांची वोट बैंक संपुर्णता संपुष्टात आली होती त्यामुळें संपूर्णतः भाजपा,पंकजा मुंडे, आणि वंजारी समाज यावर धनंजय मुंडे यांची निवडणुकीची भिस्त अवलंबुण राहिली होती…
परंतु निवडणूका कालावधी मध्यें ज्या राजकिय घटना परळी मतदार संघात घडल्या किंवा घडवुण आणल्या त्या पालकमंत्र्यांच्या पत्यावर पडल्या मागील 5 वर्षाच्या कालावधीत कैबिनटमंत्री म्हणुण धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेला शोभेल आसे एक ही ठोस काम तर त्यांच्या कडुण झालेच नाही मात्र अनेक पराक्रम त्यांच्या कडुण आसे घडले की मतदार तर सोडाच पण त्यांचे लाभार्थी आणि निष्ठावान कार्यकर्ते देखील त्यांच्यावर तोंडसुख घेत होते त्यामुळे मतदार संघाचा कौल हा परिवर्तनाच्या बाजुने 100 % झुकला होता…
राजेभाऊ फड विरुद्द धनंजय मुंडे आसा जनतेचा कौल 15 दिवसापुर्वी जेंव्हा परळी मतदार संघातील शहरासह प्रत्येक गाव आणि वाड्या वस्त्यांवर जाऊण वेगवान मराठी समुहा कडुण अतिशिय गुप्त आणि सुक्ष्म पद्धतीने निवडणुकीचा पोल घेण्यात आला होता तेंव्हा विधमान लोकप्रतिनिधीचा पराभव 30 ते 35 हजार मताच्या फरकाने होताना दिसत होता.त्यानंतर राजेसाहेब देशमुख यांना अचानक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लागलीच पहिल्या दोन दिवसात राजेसाहेब देशमुख विरुध्द धनंजय मुंडे आसा त्याच पद्धतीने आम्ही एका इतर नामांकित एजण्सी सोबत मतदारांचा कौल जाणुन घेतला त्यावेळी देखील धनंजय मुंडे विरोधात कौल होता पण 35 हजारांनी पराभुत दाखवणारा कौल एकदमच घसरुण धनंजय मुंडे यांना रेडझोन मध्यें दाखवत विसावला गेला विशेष म्हणजे यावेळी मराठा बाहुल पट्यामध्यें देखील मुंडें बद्दलची नाराजीची तिव्रता कमी झालेली दिसूण आली…
राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचाराची गुप्तता ठरवुण पाळण्यात येत आहे यामध्यें प्रमुख कारण हेच आहे की गणीमी काव्याने लढाई लढुण यश प्राप्त करायचे परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारांने आधिकाधिक मतदारां मध्यें घुसुण सुरू केलेला प्रचार आणि सक्षम यंत्रणेचा फौजफाटा धनंजय मुंडे यांच्या कडे सहज उपलब्ध आहे तो फौजफाटा राजेसाहेब देशमुख यांना तयार होऊ शकलेला नाही आणि आता ते शक्य पण नाही,मराठा मतदारांची संख्या निश्र्चित सर्वाधीक आहे त्या पाठोपाठ क्रमशः वंजारी,धनगर,मुस्लिम,हाटकर आणि बौद्ध दलित,ब्राम्हण,मारवाडी,आणि इतर.परंतु एकाच समाजाच्या मतांवर निवडणुक जिंकणे शक्य नाही,एकमात्र निश्चीत आहे पुढील चार दिवसांमध्ये जर काही बद्धल नाही झाला तर गेल्या वेळीपेक्षा आधिक मताधिक्यांनी धनंजय मुंडे यांचा विजय होऊ शकतो

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.