
वेगवान मराठी महाराष्ट् परळी प्रतिनिधी –दि 21 नोव्हेंबर– विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक 20/11/2024 रोजी दुपारी 13.00 वाजण्याचे सुमारास मतदार प्रक्रिया सुरु असतांना परळी शहरात अॅड माधव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प.गट) यांना कैलास फड +1 (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अ.प.गट) यांनी मारहाण केल्याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाला. माधव जाधव हे घाटनांदूर गावचे रहीवासी असल्याने त्याची प्रतिक्रीया उमटुन काही तरुणांनी घाटनांदूर गावातील मतदान केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करुन सुरळीत चालु असलेल्या मतदान प्रक्रियेत बाधा आणली. त्यानंतर त्या टोळक्याने चोथेवाडी येथील जि.प. शाळा येथील व मोरंबी येथील जि.प. शाळेतील मतदान केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करुन सुरळीत चालु असलेल्या मतदान प्रक्रियेत बाधा आणली. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली,
वर नमुद घाटनांदूर येथील घटनेबाबत अंबाजोगई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीविरुद्ध गु.र.नं. 354/2024 कलम 109, 118(1), 132, 189(2), 191(2), 191(3), 190, 324 (4) (5) भारतीय न्याय संहीता सह कलम 3 सार्वजनीक मालमत्ता विरुपन प्रतिबंधक कायदा, सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्द्र सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, सह कलम 131 (1), 123 (क), 135 (अ) लोकप्रतिनिधी कायदा 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोथेवाडी व मोरंबी येथे घडलेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशन बर्दापुर येथे सदर आरोपीविरुद्ध गु.र.नं. 256/2024 कलम 132, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) (5) भारतीय न्याय संहीता सह कलम 3 सार्वजनीक मालमत्ता विरुपन प्रतिबंधक कायदा, सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्द्र, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, सह कलम 131 (1), 123(क), 135 (अ) लोकप्रतिनिधी कायदा 1951 येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकुण 11 आरोपींना अटक करण्यात आले असुन त्यांना आज दिनांक 21/11/2024 रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता आरोपींना 03 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. घटना ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येवुन परीसरात शांतता प्रस्थापीत करण्यात आली.
तसेच केज मतदारसंघातील आनंदवाडी ता.जि. बीड येथील मतदान केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. उल्हास दामोदर थिगळे हे त्यांचे निवडणुक संबंधाने कामकाज करीत असतांना आनंदवाडी गावातील एक इसम नामे नवनाथ देवराम देवगुडे हा तेथे मतदान करण्यासाठी आला होता. केंद्र प्रमुख यांनी त्यांचेकडे ओळखपत्राची मागणी केली असता नवनाथ देवराम देवगुडे यांना ओळखपत्र मागीतल्याचा राग अनावर झाल्याने त्यांनी केंद्र प्रमुख श्री. उल्हास थिगळे यांना त्याच्या हातातील कड्याने डोळ्यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन उल्हास थिगळे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने नवनाथ देवगुडे यांचे विरुद्ध नेकनुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 347/2024 कलम 132, 118(2), 121(1)(2), 352 (2), 223 भा.न्या.सं. सह कलम 131 व 132 लोकप्रतिनिधी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तसेच परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर मा. निवडणुक आयोग भारत सरकार यांचे आदेशान्वये वेबकास्टींग करण्यात आले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर वेबकास्टींगचे कॅमे-याचे वायर काढून निवडणुकीच्या कामात अडथळा निमार्ण केला म्हणुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात केंद्राध्यक्ष श्री. विवेकानंद नाथराव
शिंदे यांचे फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 326/2024 कलम 131 (1), (2) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. तसेच परळी मतदार संघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रामध्ये इसम नामे किरण मधुकर उबाळे रा.
सनगांव याने मा. जिल्हाधीकारी सो बीड यांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेवून जाणेस दिलेल्या लेखी आदेशाचे उल्लंघन करुन धर्मापुरी येथील मतदान केंद्रा वर अनधीकृत मोबाईल घेवून जावून सदर ठिकाणी व्हीडीओ शुटींग केले म्हणुन त्याचे विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 325/2024 कलम 223 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील सर्व घटनांच्या अनुषंगाने पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक केली असुन परीस्थीती नियंत्रणात आणली आहे. तसेच बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परीस्थीतीवर पोलीसांनी तात्काळ नियंत्रण आणून जिल्ह्यात शांतता प्रस्थापीत करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.