क्राईमबीडराजकारण

राजेभाऊ फड यांची परळी मतदार संघातील निवडणुकी बाबत मागणी

Rajabhau Phad made this demand regarding Parli Assembly elections

परळी मतदारसंघाची निवडणूक रद्द करून निर्भय वातावरणात लोकशाही पद्धतीने फेर निवडणूक घ्या – राजेभाऊ फड

परळी विधानसभा मतदार संघात 363 पैकी 313 बुथवर बोगस मतदान

वेगवान मराठी महाराष्ट्र परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
दिनांक 21नोव्हेंबर–राज्यातील सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील राजकारणाने अतिशय घाणेरडी पातळी गाठली असून, गुंडगिरी, दादागिरी आणि बोगसगिरीचा कळस गाठला आहे. मतदानाच्या दिवशी याचा सर्वांना प्रत्यय आला. मतदारसंघातील अनेक बुथवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कब्जा मिळवून बोगस मतदान करवून घेतले. झालेला हा प्रकार लोकशाहीची हत्या करणारा प्रकार असून परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करावी आणि फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

काही लोकांनी बीड जिल्ह्याचा बिहार करून टाकला आहे. गुंडगिरी, दादागिरी, दडपशाहीच्या प्रकाराला सर्रास प्रोत्साहन दिले जात असून, प्रशासनाला हाताशी धरून अवैध प्रकार घडवून आणले जातात. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी जवळपास 300 ते 313 बूथ काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ताब्यात घेऊन बोगस मतदान केले आहे. मतदारांना धमक्या देऊन त्यांच्या हाताला फक्त शाई लाऊन परत पाठवले गेले. काही मोजकेच कार्यकर्ते सगळ्या गावाचे मतदान करत असल्याचे दिसून आले. विरोधी पक्षातील उमेदवारांना शिवीगाळ करण्यात आली, काही ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना मारहाण केली. परळी विधानसभा मतदारसंघात काही नेत्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. लोकसभेच्या मतदानाच्या वेळी परळी मतदारसंघातील जवळपास 122 बुथवर बोगस मतदान करण्यात आले होते. ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देऊन यावर मुंबई उच्च न्यायालयात आम्ही जनहित याचिका केली होती. यावर निवडणूक आयोगाने न्यायालयाला शपथपत्र देऊनही योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत.  प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदारसंघातील सर्वच मतदान बुथवर बोगस मतदान केल्याने ही निवडणूक प्रक्रिया चुकीची असल्याने रद्द करण्यात यावी व संपूर्ण परळी मतदारसंघात निर्भय वातावरणात व लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. याचबरोबर याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे

अनेक ठिकाणी सीसीटिव्ही बंद पाडले!
लोकसभा निवडणुकीत झाले तसे बोगस मतदान करण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी परळी विधानसभा मतदारसंघात बुथवर सीसीटिव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र ज्या ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडले त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेचे वायर कापण्याचे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडत असताना तिथे लावण्यात आलेली सुरक्षा यंत्रणा काय करत होती? प्रशासकीय यंत्रणेने याला वेळीच आक्षेप का घेतला नाही? असा सवाल निर्माण होत असल्याचेही राजेभाऊ फड म्हणाले. झालेल्या प्रकारची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!