
वेगवान मराठी महाराष्ट् परळी प्रतिनिधी -22 नोव्हेंबर
कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या धनंजय मुंडे व पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध – राजेसाहेब देशमुख
घाटनांदुर व परिसरात धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनीच मतदान केंद्रावर धुडगूस घातला. इव्हीएम मशीन विद्यमान पालकमंत्र्यांनीच त्यांच्या लोकांकडूच फोडले व कांगावा केला. आम्हाला जिथे उत्स्फूर्तपणे मतदान होणार होते. त्याच गावातील इव्हीएम मशीन त्यांनी का फोडले? तर निवडणूक आयोग, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा फोकस घाटनांदूरवर व्हावा आणि परळी विधानसभा मतदारसंघात १२२ बुथवर आराजकता, गुंडशाही, दडपशाही व दहशतीने बोगस मतदान करता यावे म्हणून. चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे उलट सदर घटनेच्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या आमच्या पुतण्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदविले.
गुन्हे दाखल झालेले निष्पाप कार्यकर्ते-
शंभुराजे संजय देशमुख
अक्षय कमलाकर मोरे
सुरज अशोक निंबाळकर
ओम प्रविण किर्दंत
वैभव रमेश किर्दंत
अभिजीत कल्याण देशमुख
परळी विधानसभा मतदारसंघात १२२ बुथवर आराजकता, गुंडशाही, दडपशाही व दहशतीने बोगस मतदान झाले. त्यामुळे या १२२ मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे. अशी लेखी मागणी मी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी दिवसभर परळी विधानसभा मतदार संघात धर्मापुरी, जलालपुर, परळी शहरातील बँक कॉलनी, मलिकपुरा येथे बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप स्वतः मी उमेदवार म्हणून घेतला. अशीच स्थिती मतदार संघात १२२ संवेदनशील मतदार केंद्रांवर आहे. उच्च न्यायालयाने या १२२ मतदान केंद्रावर सीआरपी बंदोबस्तात व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. अशा मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. निवडणूक आयोगाने तसे शपथपत्र ही दिले. मात्र अंमलबजावणी मात्र केली नाही. परिणामी दहशत व गुंडागर्दी करीत बोगस मतदानाची प्रक्रिया धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच राबविला. पालकमंत्र्यांनी बिहार पेक्षाही गंभीर परिस्थिती परळी विधानसभा मतदारसंघात निर्माण केली आहे. न्यायालयात याचिका दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते ऍड.माधव जाधव यांना न्यायालयात का गेलात..? या कारणावरून त्यांच्यावर परळी येथे जीवघेणा हल्ला केला. हा सर्व प्रकार पोलीस यंत्रणेसनोर होऊनही अद्यापपर्यंत कसलाही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही. ऍड.माधव जाधव यांना मारहाण करून बोगस मतदान प्रक्रिया झाकण्यासाठी हे सगळे पालकमंत्र्यांचे षडयंत्र आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते ऍड.माधव जाधव, नेत्या सुदामतीताई गुट्टे या उपस्थित होत्या.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.