राजकारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवाराचे नाव ही जाहिर

वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी

मुंबई, ता. 22 नोव्हेंबर 2024- Maharashtra Chief Minister announced महाराष्ट्र विधानसभेचे नुकताच 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घसून झालेल्या या निवडणुकीमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.

एक्झिट पोलचे आकडे जाहीर झालेले आहे. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार महायुतीची सत्ता येणार असं चित्र दिसत आहे. एवढचं नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा घोषित करून टाकलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये अजित पवार मुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतील असेही जगजाहिर करून टाकलेला आहे.

विधानसभेचा होत्या मतमोजणी आहे. या मतमोजणी मध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागून आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांची जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्सी खेच झालेली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार.

मात्र महाराष्ट्र मधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी जर आपण पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल की महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अजित पवार यांचा बॅनर जे आहे ते झळकलेला आहे. एक्झिट पोलचे आकडे जाहीर समोर आल्यानंतर अजित पवारांचा बॅनर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी झळकण्यात आलं.

अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारे बॅनर पुण्यात पाहायला मिळाले

पुण्यातील पर्वती परिसरात अजित पवार यांना ‘मुख्यमंत्री’ असे लिहिलेले बॅनर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. “आदरणीय अजितदादा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून दणदणीत विजय झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन” असे बॅनरवर लिहिले होते. मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा धाडसी उल्लेख केल्याने उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार किंगमेकर होतील अशी अपेक्षा आहे

सहा प्रमुख पक्षांमध्ये अजित पवार यांचे स्थान कमी असल्याचे भाकीत काहींनी वर्तवले असले तरी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना पवारांच्या निर्णायक भूमिकेवर विश्वास आहे. मिटकरी म्हणाले की, अजित पवार यांच्या 22-25 आमदारांचा गट कोणाची सत्ता येईल हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

आपले अंदाज शेअर करताना मिटकरी म्हणाले, “कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, परंतु महायुतीद्वारे (महागठबंधन) सरकार स्थापन केले जाईल.” ते पुढे म्हणाले, अजित पवार २५ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे केवळ नेते नसून नवीन सरकार घडवणारे किंगमेकर आहेत, असे मिटकरी यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!