
वेगवान मराठी
मुंबई, ता. 26 नोव्हेंबर 2024-
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.Chief Minister Eknath Shinde resigns
दरम्यान, राज्यपालांनी शपथविधी सोहळ्यापर्यंत एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
घटनात्मक तरतुदींनुसार, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा देखील दिला जातो, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जाण्यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे मानले जाते.








