
वेगवान मराठी परळी :–परळी प्रतिनिधी दिनांक 30/11/24 -परळी शहरातील पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर कृष्णा चित्रपट गृहा समोर ड्रा. यशवंत देशमुख यांचा दवाखाना आहे,फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दोन दिवसापुर्वी परळी शहरातील फुलेनगर येथील एक दलित समाजाची युवती या दवाखाण्यात उपचारासाठी आली आसता.ड्रॉ यशवंत देशमुख यांनी या तरुणीचा विनयभंग होईल आसे गैरकृत्य करण्याच्या हेतुने अश्लिल संभाषण करत बैडटच करत सलगी केल्याचा सदरील पिडीत मुलीने आरोप केला होता…
दरम्यान काल या घटणेशी चर्चा काल वाऱ्यासारखी परळी शहरात पसरली या घटणेशी दखल घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीन पिडीत तरुणी आणि पोलिस प्रशासना कडुण शहाणीशा करुण आरोपी ड्रा यशवंत देशमुख यांच्यावर दलित तरुणीची छेडछाड करून ड्राक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करुण त्वरित अटक करण्यात यावी यासाठी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर काल निदर्शने करण्यात आले होते…
पोलिस प्रशासनाच्या वतीने आरोपीस अटक करण्यात दिरंगाई होत असल्यामुळें आणि ड्रा यशवंत देशमुख यांच्या निषेधार्थ व दलित तरुणीच्या समर्थनार्थ आज परळी बंद करण्याचे आव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाच्या वतीने करण्यात आले असुण आरोपीस तात्काळ अटक करा म्हणुण परळी शहर पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता , यावेळी जमावा कडुण आरोपी ड्रा च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली…
याच घटणेला ड्रा यशवंत देशमुख यांच्या समर्थनार्थ मराठा समाजासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट देखील मैदानात उतरले असुण या नेत्यांनी यशवंत देशमुख यांच्या वर विधानसभा निवडणूकीत राजेसाहेब देशमुख यांना सहकार्य केल्याच्या कारणावरून खोटे गुन्हे दाखल करुण खोट्या नाट्या बोगस प्रकरणात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकां कडुण करण्यात आला आसल्याचे आरोप करण्यात येत आहेत…
दरम्यान खरेखोटे काय ते देवजानो परंतु शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असुण या संवेदनशील घटणेला राजकीय आणि जातीचे वळण लागल्यमुळे सामान्य नागरीकांसह व्यापारी उद्दोजक नोकरदार आणि कामगार वर्ग प्रभावित झाला आहे…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.