क्राईम

केज नंतर आष्टीचा नंबर गांजाच गांजा ढिगभर

After Cage, Ashti's number was found in Pimpri with a pile of ganja.

!! केज पाठोपाठ आष्टी मध्ये गांजाच गांजा !!

केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी बीड-दिनांक 24/06/2025 रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, पिंपरी आष्टी शिवारातील गट क्रमांक 71 या ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.

सदर माहितीची खातरजमा करून पोलीस उपअधीक्षक मा. श्री. बाळकृष्ण हानपुडे पाटील SDPO आष्टी यांचेसह पोलीस पथक व पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला.

छापेमारी दरम्यान, इसम घनश्याम बाबुराव डांगरे, वय 53 वर्षे, रा. पिंपरी आष्टी यांच्या मालकीच्या शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड आढळून आली. शेतात एकूण 08 गांजाची ओली झाडे मिळून आली असून वजन 13.340 किलोची अशी पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे.

मुद्देमालाची एकूण बाजार मूल्य अंदाजे रु. 3,33,500/- इतकी आहे.

हि कारवाई मा. श्री. नवनीत काँवत साहेब पोलीस अधीक्षक बीड, मा. श्री. सचिन पांडकर साहेब अपर पोलीस अधीक्षक बीड ,

मा पो. उपधीक्षक श्री. बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय नरवाडे, सपोनि विक्रांत हिंगे, पोउपनि श्रीकृष्ण शिंदे, पो.ह. देविदास जमदाडे, सुनील अलगट,

  • प्रवीण क्षीरसागर, संतोष दराडे, कृष्णा डोके, राम आगरकर, भरत कोळेकर, सचिन पवळ, संध्या लोंढे, राम भाग्यवंत यांच्या संयुक्त पथकाने केली.

सदर गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीवर NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू आहे.

✒️ KESHAV D MUNDE WEGWAN MARATHI NEWS NETWORK PARLI BEED MAHARASTHRA -8888387 622

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!