क्राईमखेळछत्रपती संभाजी नगरपुणेबीडमहाराष्ट्र

न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई

LCB's action against Justice Dhananjay Nikam in the case of taking bribe

वेगवान मराठी -केशव मुंडे दि -11 /12/24 सातारा प्रतिनिधी- न्याय देणारेच जर अन्यायाला खतपाणी घालत कस तील तर सामान्यांनी काय करायचे आणि कोणाकडुण न्यायाची अपेक्षा करायची हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही,न्याय देखील जर विक्रीसाठी बाजारात येऊ लागला तर स्वातंत्र्य,संविधान,लोकशाही,न्यायालये,न्यायाधिश या सर्व गोष्टी भंपक वाटु लागतील आणि देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही याचे भान सरकारणे ठेऊण कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे

थोडक्यात माहिती यातील महिला तक्रारदार यांचे वडीलांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे दि. २६/१०/२०२४ रोजी गुरनं. ९७२/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे व ते सध्या न्यायालयीन कोठडीत कैद आहेत. त्यांनी सत्र न्यायालय, सातारा येथे जामीन अर्ज दाखल केलेला आहे. सदरचा जामीन अर्ज हा लोकसेवक न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सातारा यांचे न्यायालयात सुनावणीकरीता प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांनी लोकसेवक न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे ५,००,०००/- (पाच लाख) रुपयाच्या लाचेची मागणी केलेबाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, दि. ०३/१२/२०२४ रोजी व दि. ०९/१२/२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक न्यायाधीश धनंजय निकम यांनी खाजगी इसम किशार खरात व आनंद खरात यांच्याशी संगणमत करुन स्वतःसाठी तक्रारदार यांच्या वडीलांचा त्यांच्या कोर्टात प्रलंबित असलेला जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी नमूद दोन खाजगी इसमांचे मार्फतीने तक्रारदाराकडे ५,००,०००/- (पाच लाख) रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवून तसेच ती लाच रक्कम नमुद खाजगी इसमांच्या करवी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

लाच मागणी पडताळणी दरम्यान घडलेल्या घटनेच्या आधारे लोकसेवक न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सातारा, खाजगी इसम किशोर संभाजी खरात, खाजगी इसम आनंद मोहन खरात व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ, १२ सह भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाचे नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.

१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४. २६१३२८०२, २६०५०४२३

२) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७००

३) ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

५) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

11/12/201

(दयानंद गावडे)

सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप-अधीक्षक, (प्रशासन) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!