आता पेट्रोल -डिझेल टाकण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही,घरपोच मिळणार
Walking Petrol Diesel Pump

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 12 डिसेंबर 2024- Walking Petrol Diesel Pump आता येतो पुढे तुम्हाला पेट्रोल -डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर घेण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल असं शक्य आहे. तर हे शक्य आहे कारण हा प्रयोग राबवल्यामुळे तुम्हालाही पेट्रोल आणि डिझेल घरीच मिळणार आहे.
पेट्रोल पंपासाठी आपल्याला जागेची आवश्यकता लागत असे, मात्र आता येथून पुढे तुम्हाला जागेची आवश्यकता नाही. पेट्रोल पंपासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी पेट्रोल पंप मंजूर झाला याची वाट पाहावी लागत होती.
पेट्रोल पंपासाठी कंपनीकडून जागा निर्धारित करण्यात येत होती, की नेमकी कोणत्या ठिकाणी पेट्रोल पंप चालणार आहे. त्याचा सर्वे केला जात होता. त्यानुसार पेट्रोल पंपाला मंजुरी मिळत होती. इंडियन ऑइल आणि भारत किंवा इतर कंपन्या मार्फत पेट्रोल पंप चालविला जात होता. मात्र आता येथुन पुढे पेट्रोल पंपाचे मार्केट कोसळणार यात शंकाच नाही. कारण आता पेट्रोल आता घरोघरी मिळणार आहे.
जर तुम्हाला पेट्रोल पंप टाकयचा असेल तर तुम्हाला आता पेट्रोल पंपासाठी जागेची गरज नाही. तुम्ही लोकांच्या घरोघरी जावून पेट्रोल -डिझेल विकु शकतात. तुम्ही म्हणत असेल आम्ही काही पण सांगतो तर हे सत्य आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज फिरत्या पेट्रोल पंपाचे संतोषी माता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भाऊ दराडे यांच्या हस्ते झाले असून अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखाधिकारी संदीप वाल्मीक ह भ प माऊली महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
नाशिक जिल्ह्यामध्ये फिरता डिझेल पंप प्रथम सुरू झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपाची संख्या कमी असल्याचे कारणाने या पेट्रोल पंपाचे संचालक लक्ष्मण घुगे मंगेश घुगे अविष्कार घुगे राजेंद्र घुगे यांनी ही संकल्पना तयार केली आणि या डिझेल पंपाची मंजुरी मिळवली.
सदर डिझेल पंप पानेवाडी येथून इंडियन ऑइल या डेपोतून डिझेल भरून मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये फिरता डिझेल पेट्रोल पंप सुरू झाल्याने राजापूर व परिसरातील लोकांनी समाधान व आनंद व्यक्त केले.
आपल्या गावामध्ये डिझेल येणार आपली समस्या दूर होणार त्यामुळे लोकांचा वेळ खर्च वाचणार असल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली. या फिरत्या डिझेल पेट्रोल पंपाच्या गाडीचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे. या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला असून काही ग्रामस्थांनी या डिझेल पंपाचे संचालक यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला आई-वडिलांच्या हस्ते या पंपाच्या गाडीचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी गावातील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कसे वाटप होणार पेट्रोल -डिझेल
येथून पुढे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फिरते पेट्रोल पंप सुरु होऊन पेट्रोल डिझेल जागेवर मिळणार आहे. पेट्रोल टाकण्यासाठी टॅंकर ची सुविधा असून त्याचे मीटर हेही त्यावर फिट केले आहे. जसं आपण नियमती पेट्रोल टाकतो त्या पध्दतीने हे पेट्रोल मिळणार आहे. पेट्रोल -डिझेल इंडियन आॅईळ या डेपोतून मिळणार असल्यामुळे तसेच त्याची सुरक्षा अत्यंत कडक असल्यामुळे शुध्द पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांना घरपोच मिळणार यात शंका नाही.
