राम शिंदे होणार विधानपरिषदेचे अध्यक्ष महोदय
Mr. Ram Shinde will be the President of Legislative Council

वेगवान मराठी मुंबई -केशव मुंडें दिनांक 17 डिसेंबर 2024 महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्षीय महोदय म्हणुण आहिल्यानगर येथील भाजपचे नेते प्रा.राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे,राम शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला नव्हता तेंव्हापासून शिंदे यांना कोणती जबाबदारी सोपविण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष होते,धनगर समाजातील नाराजी दुर करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आसल्याचे सांगण्यात येत आहे तर राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आसल्याने त्यांना पराभुत होऊण देखील संधी देण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे
चंद्रशेखर बावन्नकुळे यांची घोषणा: – भारतीय जनता पार्टीचे नेते आ. प्रा. Ram Shinde जी यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.
जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व अशी आ. प्रा. राम शिंदे यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देऊन विधान परिषदेचे कामकाज सुरळीत व शिस्तबद्ध पार पाडण्याचे शिवधनुष्य आ. प्रा. राम शिंदे समर्थपणे पेलतील, हा मला विश्वास आहे.आ.प्रा.राम शिंदे यांना शुभेच्छा.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.