क्राईम

धर्मापुरीचे बर्दापूर गांजा कलेक्शन उघडकीस !! आरोपी ताब्यात

Dharmapuri's Bardapur ganja collection exposed, accused in police custody

परळी तालुक्यातील धर्मापुरीचे बर्दापूर गांजा कलेक्शन !! आरोपी थेट पोलिसांच्या जाळ्यात 

आयपीएस ऋषिकेश शिंदे यांची बर्दापूर हद्दीत धाडसी कारवाई; १० लाखांच्या गांजासह तिघांना अटक!

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे बीड अंबाजोगाई: अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने बुधवारी मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३३ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

या मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख ८०० रुपये इतकी आहे.

नितीन कांदे आणि भाऊ चौधरी हे धर्मापुरी येथील भास्कर ऊर्फ बबलू फड याला गांजा देण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच,

पोलिसांनी मूर्ती फाट्याजवळ सापळा रचून या तिन्ही आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेतले.

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पंचनामा केला असून रात्री उशिरा बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!