परळी तालुक्यातील सरपंचा कडुण प्रवेशद्वारास आंबेडकरांच्या नावाला विरोध
Strange incident in Parli taluka: Sarpanch Kadun opposes the name of Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the Indian state.

बीड -परळी तालुक्यातील मौजे दौनापुर येथील सरपंचासह इतर जनांकडुण चक्क संविधानाचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाच्या प्रवेशद्वार निर्मितीस विरोध
या प्रकरणी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंबेडकरवादी चळवळीतील सामाजीक कार्यकर्ते दलित नेते मिलींद घाडगे व विशाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी तिन दिवसापासुण अमरण उपोषण सुरु केले आहे

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 22 मे 2025 प्रति,मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड –(यांना निवेदन सादर केलेली तारीख 9/9/2025)
विषय : बौध्द वस्तीत डॉ. बावसाहेब आंबेडकर यांच्या नावे प्रवेशद्वार करण्यासाठी विरोध करणा-या जातीवादी, राजकीय सुड भावनेतुन प्रेरीत होवुन दोन समाजात तेढ करणा-या
सरपंच व विरोधकांची चौकशी करून अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हें दखल करणसाठी आमरण उपोषण करणे बाबत
मा.महोदय,
वरील विषयी आपल्या सेवेत विनंती अर्ज सादर करण्यात येतो की, आम्ही खालील सहया करणारे नागरीक मौजे दौनापुर ता. परळी वै.जि.बीड येथील रहिवाशी असुन भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार/कमान मौजे दौनापुर येथील बौध्द वस्तीत मुख्य प्रवेशद्वारावर करण्याची समस्त बौध्द समाजाची एकमुखी मागणी आहे.
त्या बाबत आम्ही रितसर व कायदेशीर परवानगीसाठी मौजे दीनापुर आमपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यानां लेखी अर्ज दिनांक ०८/०४/२०२५ रोजी दिला आहे.
त्यावर सरपंचाने ग्रामसभेचा ठराव घेतल्याचे लेखी देवुन कळवले आहे की, गावातील दोन व्यक्ती १. बळीराम पांडुरंग आंधळे व २. विष्णु साहेबराव अघाव रा. दौनापुर ता. परळी वै. हे विरोध करीत असल्यामुळे परवानगी देता येत नसल्याचे कळवले आहे.
वास्तवीक पाहता भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संबध व जगाचे विश्व भुषण आहेत
आणि त्यांच्याच नावाची अॅलर्जी निवेदनात नमुद जातीवादी व्यक्तीनां दिसुन येत आहे व ग्रामपंचायतीला/सरपंचाला आदेश, हे विरोध करणारे लोक देतात काय? व त्यांच्या आदेशावर सरपंच/ग्रामपंचायत चालते काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बळीराम पांडुरंग आंधळे व २. विष्णु साहेबराव अधाव या दोन व्यक्तीच्या आडुन सरपंच राजेभाऊ प्रभाकर अधाव हे राजकीय, जातीवादी हेतुने प्रेरीत होवुन महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला प्रवेश द्वाराला विरोध करीत आहेत.
या बाबत सरपंच राजसोऊ प्रभाकर अधाव हे दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 25
तरी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करून समस्त बौध्द समाजाची भावना पायदळी तुडवुन जातीवाद करणा-या १. सरपंच राजेभाऊ प्रभाकर अधाव २. बळीराम पांडुरंग आंधळे ३. विष्णु साहेबूराव अघाव यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करून
भारतीय घटनेचे शिल्पकार -विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे नावे मौजे दौनापुर ता.परळी वै. जि.बीड येथील वस्तीतील मुख्य प्रवेशद्वारावर कमान लावण्यासाठी मौजे दौनापुर येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दिनांक 20 मे 2025 पासून उपोषण करण्यात येत आहे
दरम्यान या उपोषन कालावधीत उपोषन कर्त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर यास संपुर्णता दौनापुर चे सरपंच राजेभाऊ प्रभाकर आघाव ,बळीराम पांडुरंग आंधळे,विष्णू साहेबराव आघाव यांच्यासह प्रशासण जबाबदर राहिल याची दखल घ्यावी…
आसा सुचक ईशारा मिलिंद घाडगे व विशाल सुर्उयवंशी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली उपोषण करणाऱ्या चंद्रमुनी रामकिशन घाडगे, हरिभाऊ साधू घाडगे, रामचंद्र भगवान घाडगे, किसान अच्युत घाडगे, बनसोडे रामचंद्र दिलीप यांच्या कडुण देण्यात आला आहे
सदरील निवेदनाची प्रत व स्वीस्तर माहिती वेगवान मराठी कडे उपोषण स्थळी उपोषण कर्ते मिलिंद घाडगे व विशाल सुर्यवंशी यांच्या कडुण प्रसिद्धि साठी सुपुर्द करण्यात आली.

✒️.wegwan marathi news network keshav d munde beed parli 8888 387 622 MAHARASHTRA

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








