शेतकऱ्यांसाठी केंद्र शासणाची मोठी योजना कार्यान्वीत
Central government's big scheme for farmers launched by Shivraj Singh Chauhan

वेगवान मराठी -केशव मुंडे -दि २४ डिसेंबर 2024 प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेंतर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुणे येथे किसान सन्मान दिनानिमित्त आयोजित शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात केले.
कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आयसीएआर, नवी दिल्लीचे सहायक महासंचालक डॉ. संजय कुमार सिंह, राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ६ लाख ३७ हजार ८९ पक्की घरे देण्यात येत असून आता पुन्हा नव्याने १३ लाख २९ हजार ६७८ पक्की घरे अशी एकूण १९ लाख ६६ हजार ७६७ घरे देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी केली.
कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असून कृषीमधील पारंपरिक विज्ञानदेखील महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राने नैसर्गिक शेतीचे अभियान स्वीकारले असून २५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील रहावे लागेल. शेतीचे क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न करावा लागेल. यामुळे ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’योजनेपासून वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणल्या आहेत.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यक्रमात केंद्र शासनाच्या कृषी, ग्रामविकास योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात प्रगतिशील शेतकरी, लघुउद्योजक व ग्रामविकास विभागाच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या.
©वेगवान मराठी परळी बीड -केशव मुंडे महाराष्ट्र संपर्क 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.