महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात आता किटकनाशक सुध्द डुब्लीकेट

वेगवान मराठी /  मारुती जगधने

नाशिक, ता. 23 – दातीर मळा, एमआयडीसी अंबड नाशिक येथे एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे रुपये ९.५० लाखांचा किटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अवैध व विनापरवाना किटकनाशके विक्रीचा काळा धंद्याची सुळसुळाट झाल्याची गुप्त माहिती नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती.

त्या अनुषंगाने मा. सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, विभाग, मा.कैलास शिरसाट,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, मा.जगदीश पाटील , कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, मा.संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉ.जगन सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदस्य कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक विभाग, दिपक सोमवंशी मोहीम अधिकारी नाशिक, विजय चौधरी ,तंत्र अधिकारी, नाशिक,राहुल अहीरे, कृषी अधिकारी पंचायत समिती, नाशिक यांच्या भरारी पथकाने दातीर मळा एमआयडीसी अंबड येथील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाड्यावर छापा मारून तेथे साठवणूक केलेल्या अवैध व विनापरवाना किटकनाशकांचा साठा जप्त केला.

संशयित गाळामालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे डॉ. जगन सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ,नाशिक यांनी किटकनाशक कायदा १९६८, किटकनाशक नियम १९७१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व भारतीय न्याय संहिता ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथकास ट्रू बडी कन्सल्टिंग प्रा.लि.या संस्थेच्या प्रदीप शर्मा व आंचल लिखा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

नाशिक विभागात अवैध व संशयास्पद निविष्ठा बाबत कोणतीही माहिती शेतकरी बांधवांना असल्यास त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा भरारी पथकास कळवावे. अवैध व बोगस निविष्ठा शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करून फसवणूक करणाऱ्या इसमां विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मा.सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बंधु आसमानी संकटामुळे आधीच त्रासलेला असताना अवैध व विनापरवाना निविष्ठा शेतात वापर केल्याने शेतकरी बांधवांचे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेते कडून पक्क्या बिलात कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!