काय ! तुमचे मुल मिसींग तर नाही ना ? असेल तर मग उघडा बातमी
30 जानेवरी पर्यंत बालकांना घेउण जाण्याची संधी

( बालकल्याण समितीकडे असलेल्या बालकांची ओळख पटवून , 30 जानेवारीपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन )
वेगवान मराठी बीड दि. 8 (K.D.MUNDE):- चि.माणिक उत्तरेश्वर यादव जन्म दिनांक १४/०६/२०१४ वय १० वर्ष ०६ महिने रा. सध्याचा पत्ता शांतीवन मुलांचे बालगृह, आर्वी, जि. बीड. बालकाचा रंग काळा सावळा असून डाव्या गालावर तीळ आहे. हे बालक मा. बालकल्याण समिती बीड यांच्या आदेशाने दिनांक २८/११/२०२२ रोजी या बालगृहात दाखल झाला आहे. सदर बालकास दाखल झाल्यापासून कोणीही आई वडील व इतर नातेवाईक भेटण्यास आले नाही.
चि.गणेश रेश्मा पवार जन्म दिनांक ०४/०९/२०१२ वय १२ वर्ष ०३ महिने सध्याचा पत्ता शांतीवन मुलांचे बालगृह, आर्वी, जि. बीड सध्याचा पत्ता रा.पहूर पेठ ता. जामनेर जि. जळगाव. बालक हा रंगाने काळा सावळा असून उजव्या डोळ्यावर तीळ आहे.हे बालक मा. बाल कल्याण समिती बीड यांच्या आदेशाने दिनांक ०५/१०/२०२३ रोजी या बालगृहात दाखल झाला आहे.
चि..सूर्या रेश्मा पवार दिनांक २२/०४/२०१५ वय ०९ वर्ष ०८ महिने, सध्याचा पत्ता शांतीवन मुलांचे बालगृह, आर्वी, जि. बीड कायमचा पत्ता रा.पहूर पेठ ता. जामनेर जि. जळगाव. बालकाचा रंग गोरा असून उजव्या बाजूला मानेवर तीळ आहे. हे बालक मा. बाल कल्याण समिती,जळगाव यांच्या बदली आदेशाने व मा. बाल कल्याण समिती बीड यांच्या आदेशाने दिनांक ०५/१०/२०२३ रोजी या बालगृहात दाखल झाला आहे.
चि.राज रेश्मा पवार वय ०६ वर्ष (अंदाजे) सध्याचा पत्ता सुलभा सुरेश जोशी शिशुगृह आर्वी,जि. बीड व कायमचा पत्ता रा.पहूर पेठ ता. जामनेर जि. जळगाव.बालकाचा रंग गोरा असून चेहरा गोलाकार आहे.छातीवर तीळ आहे. बाल कल्याण समिती,जळगाव यांच्या बदली आदेशाने व मा. बाल कल्याण समिती बीड यांच्या आदेशाने दिनांक ०५/१०/२०२३ रोजी या बालगृहात दाखल झाला आहे आहे.
कु. गंगा रेश्मा पवार जन्म दिनांक २१/०७/२०१३ वय ११ वर्ष ०५ महिने सध्याचा पत्ता शांतीवन मुलींचे बालगृह, आर्वी, जि. बीड. कायमचा पत्ता रा.पहूर पेठ ता. जामनेर जि. जळगाव. बालिकेचा रंग गोरा असून दोन्ही भुवयामध्ये तीळ आहे. मा.कल्याण समिती,जळगाव यांच्या बदली आदेशाने व मा. बाल कल्याण समिती बीड यांच्या आदेशाने दिनांक ०५/१०/२०२३ रोजी या बालगृहात दाखल झाला आहे.
कु.जया विदेश उपाध्याय जन्म दिनांक ०१/०२/२०१९ वय ०५ वर्ष ११ महिने सध्याचा पत्ता सुलभा सुरेश जोशी शिशुगृह आर्वी,जि. बीड येथे मा.बालकल्याण समिती, बीड यांच्या आदेशाने दाखल केले आहे. बालिकेचा रंग काळा सावळा असून डाव्या गालावर तीळ आहे.
चि. स्वदेश विदेश उपाध्याय जन्म दिनांक ०१/०५/२०१७ वय ०८ वर्ष ०३ महिने सध्याचा पत्ता शांतीवन मुलांचे बालगृह, आर्वी, जि. बीड. येथे मा.बालकल्याण समिती, बीड यांच्या आदेशाने दाखल केले आहे. बालक रंगाने काळा सावळा असून डाव्या डोळ्यावर तीळ आहे.
- बालकाचा फोटो व बातमी प्रसारीत झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मा. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,बीड, मा.बालकल्याण समिती, बीड व शांतीवन मुलांचे बालगृह, आर्वी, जि. बीड. व सुलभा सुरेश जोशी शिशुगृह आर्वी,जि. बीड आणि शांतीवन मुलींचे बालगृह, आर्वी, जि. बीड. तसेच संस्थेच्या पत्यावर अथवा अधीक्षक- मो. क्र.९९२३७७२६९४, ९४२१२८२३५९ फोनवर संपर्क करावा अन्यथा बालकल्याण समिती बालकाबाबत योग्य ते कायदेशीर निर्णय घेतील. मुदत संपल्यानंतर कोणताही दावा अथवा हक्क मा. बालकल्याण समिती बीड ग्राह्य धरणार नाही. असे बालकल्याण समितीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
- जाहिराती साठी संपर्क :-वेगवान मराठी बीड -K.D.MUNDE– 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.