बीड मधिल 2023 व 2024 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची व पोलीसांच्या कामगीरीची प्रेस नोट जारी
नवनीत कॉवत यांनी घेतला मागील दोन वर्षाचा आढावा

वेगवान मराठी बीड -K.D.MUNDE-प्रेस नोट दि. 08/01/2025: 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलीसांची सरस कामगीरी.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत साहेब यांनी 2023 व 2024 या वर्षातील बीड पोलीसांनी केलेली कामगीरीची प्रेस नोट काढली आहे, त्यामुळे नवनीत कॉवत साहेब यांनी पदभार सांभळण्याच्या आगोदरचा बीड जिल्हा काय होता आणि पदभार सांभाळल्या नंतर नवनीत कॉवत यांच्या कारकिर्दी मधील बीड जिल्हा कसा झाला भविष्यात हा फरक स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चीत…
नुकतेच 2024 हे वर्ष संपले असून 2025 या नुतन वर्षास सुरुवात झाली आहे. 2023 या वर्षाच्या तुलनेत 2024 या वर्षात बीड पोलीस दल कारवायांच्या बाबतीत सरस ठरले आहे. त्याचप्रमाणे 2023 व 2024 या दोन्ही वर्षांच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यामध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
गंभीर गुन्ह्यांचा आलेख बघता 2023 या वर्षात बीड जिल्ह्यात खुनाचे एकुण 64 गुन्हे दाखल असुन त्यापैकी 60 गुन्हे उघड आहेत तर 2024 या वर्षात 40 खुनाचे गुन्हे दाखल असुन सर्व गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात मोठी घट झाल्याचे दिसुन येत आहे.
तसेच 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न या सदराखाली बीड जिल्ह्यात एकुण 165 गुन्हे दाखल असुन त्यापैकी 164 गुन्हे उघड करण्यात आले आहेत तर 2024 या वर्षात खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकुण 191 गुन्हे दाखल आहेत तर त्यापैकी 190 गुन्हे उघड आहेत.
तसेच दरोडा या सदराखाली बीड जिल्ह्यात 2023 या वर्षात 14 गुन्हे दाखल असुन 14 गुन्हे उघड आहेत तर 2024 या वर्षात 22 गुन्हे दाखल असुन त्यापैकी 19 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे.
बलात्कार संभोग या सदराखाली बीड जिल्ह्यात सन 2023 या वर्षात 164 गुन्हे दाखल असून त्यापैकी 163 गुन्हे उघड आहेत. तर 2024 या वर्षात 176 गुन्हे दाखल असुन त्यापैकी 173 गुन्हे उघड आहेत.
यावरुन गुन्हे नियंत्रण व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांच्या सांघीक प्रयत्नांना यश आल्याचे दिसुन येत आहे.
तर अवैध धंद्यांवरील कारवायांमध्ये सुद्धा बीड पोलीस सन 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वरचढ ठरल्याचे दिसत आहे.
सन 2023 मध्ये बीड जिल्ह्या पोलीसांनी 1931 ठिकाणी छापे टाकुन अवैध दारुविक्री संबंधाने कारवाया केल्या असुन 78,87,403/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर 2024 मध्ये 1857 अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी छापे टाकुन 2,56,66,269/- रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे.
सन 2023 मध्ये बीड पोलीसांनी 17 ठिकाणी छापे टाकुन 72,32,917/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन त्या तुलनेत सन 2024 मध्ये 16 ठिकाणी छापे टाकुन 1,28,59,551/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.
सन 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मिळालेल्या मुद्देमालाची संख्या जास्त असल्याचे दिसुन येत आहे.
त्याच प्रमाणे बीड जिल्ह्यात पोलीसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाया केल्याचे दिसुन येत आहे.
सन 2023 या वर्षात सीआरपीसी कलम 107 प्रमाणे 10119 इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली असुन सन 2024 मध्ये 10957 इसमांवर प्रतिबंधक कारवाया केल्याचे दिसुन येत आहे.
सन 2023 या वर्षात सीआरपीसी कलम 110 प्रमाणे 512 इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली असुन सन 2024 मध्ये 818 इसमांवर प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत.
सन 2023 या वर्षात रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अस्तीत्व लपवून ठेवणाऱ्या एकुण 19 इसमांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कमल 122 प्रमाणे गुन्हे दाखल करुन प्रतिबंध करण्यात आला असुन सन 2024 मध्ये 24 इसमांवर म.पो.अ. कलम 122 प्रमाणे गुन्हे दाखल करुन प्रतिबंध करण्यात आला आहे.
सन 2023 या वर्षात 32 सराईत अवैध दारु विक्रेते यांचेवर महराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असुन
सन 2024 मध्ये 475 सराईत अवैध दारु विक्रेत्यांवर कलम 93 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक शांतता भंग करण्याऱ्या टोळ्या तसेच सराईत गुन्हेगार यांना हद्दपार करण्याच्या कारवाया सुद्धा बीड पोलीसांनी मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसुन येत आहे.
सन 2023 या वर्षात 09 सराईत गुन्हे करणाऱ्या टोळ्या बीड जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आल्या आहेत. तर 2024 मध्ये एकुण 5 टोळ्या बीड जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आल्या आहेत.
तसेच सन 2023 मध्ये बीड जिल्ह्यातुन 33 सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवीण्यात आले असुन सन 2024 या वर्षात 57 सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहे.
त्याचप्रमाणे सन 2023 या वर्षात 19 सराईत गुन्हेगारांना MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले असुन सन 2024 या वर्षात सुद्धा 19 सराईत गुन्हेगारांना MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
एकंदरीत बीड जिल्हा पोलीस दलाने केलेली कारवाई ही सांघीक असुन बीड पोलीसांनी गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी केलेल्या प्रामाणीक प्रयत्नांचे फलीत आहे.
यापुढेही बीड पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी अंमलदार यांनी निर्भीड, निष्पक्ष काम करुन यापेक्षा अधिक चांगले काम करुन बीड जिल्हा पोलीस दलाचा नाव लौकीक करावा.
तसेच चांगले काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.