करुणा शर्मा यांच्या गाडीत रिव्हाल्वर ठेवणारी ती कोण होती महिला साडीत
आक्का आणि मुन्नी सुरेश धसांनी सगळच सांगीलं

वेगवान मराठी बीड प्रतिनिधी -9 जानेवारी २०२५
पैठण येथील जन अक्रोष मोर्चास संबोधन करतानी भाजपचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी परळी आणि बीड जिल्हयातील अनेक प्रकरणे उघड करत संबंधीतांवर गंभीर आरोप केले आहेत, 
- संतोष देशमुख यांच्या खुनातील गुन्हेगारांना फाशी होतानी त्यांना आम्हाला पाह्यायचे असल्याचे सांगतच,आवाधा कंपनीणे दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी मध्ये असलेल्या विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे पुण्यासह राज्यभर गुन्हेगारी नेटवर्क असुण,वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या करोडोच्या प्रॉपर्टीज असल्याचे नाव आणि ठिकाणांसह जाहीर सभेत बोलताना सुरेश धस यांनी आरोप केले आहेत….

राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटातील एक बदनाम झालेली मुन्नी आमोल मिटकरी आणि इतरांना समोर करुण माझ्यावर आरोप करायला लावत आसल्याचे त्यांनी काल म्हटले होते मात्र हि मुन्नी कोण ? हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला होता,
आज सुरेश धस यांनी सांगितले की हि मुन्नी महिला नेता नसुण ती बदनाम झालेली मुन्नी हा पुरुष आहे.आणि करुणा मुंडे यांच्या गाडीत रिव्हाल्वर ठेवणारी ती साडीतील महिला नसुण तो पुरुष आहे आणि तो केवळ पुरुष नसुण तो एक पोलीस पुरूष आहे आणि त्या साडीतील पोलीसाचे नाव संजय सानप आहे !
असे सुरेश आण्णा धस यांनी सांगत जाहीर सभेत त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सांगीतले आहे तर त्याच्या सोबत इतर ही दोन सहकारी पोलीस असल्याचे सांगुण एकच खळबळ उडवुण दिली आहे…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.









