नेत्याचा राजीनामा हा मागण्याच्या आगोदर सही करुण तयार पाहीजे सारडगांव येथील सप्ताह्यात सानप महाराजांनी सुनावले
Sopan Maharaj Sanap told Dhananjay Munde without taking his name in front of Pankaja Munde during the weekend in Saradgaon.

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी-केशव मुंडे सारडगांव -दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी संत केदारी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्य महाराष्ट्रातील सांप्रदायिक क्षेत्रातील सर्वांना आपलसे वाटणारे लोकप्रिय किर्तनकार हभप सोपान महाराज शास्त्री सानप यांची सारडगांव येथील सप्ताहा महोत्सवातील सलग सात व्या वर्षी नियमाची किर्तन सेवा संपन्न झाली…
दिनांक 10 जानेवारी शुक्रवार 2025 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत हभप सोपान महाराज शास्त्री सानप यांची किर्तन सेवा हि सारडगांव ता परळी वै जिल्हा बीड येथे आयोजीत संत केदारी महाराज अखंड हरिनाम सप्ताहा निमित्य आयोजित करण्यात आली होती,
समाजा समाजातील वाढत चालेल्या तेढा बद्दल चिंता व्यक्त करत हभप सोपान महाराज शास्त्री यांनी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांनी लोकां समोर आपल्या वर्तनुकीने आदर्श निर्मान केला पाहिजे,जनतेला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वता चांगली कृती केली पाहिजे,वाम मार्गाने अमाप धन कमवुन स्वतः साठी त्याचा संचय करण्यापेक्षा,चांगल्या मार्गाने कमावलेल्या धनाचा काही भाग लोकहिता साठी खर्च केला पाहिजे, काही हिस्सा हा दान धर्म केला पाहीजे तरच समाज चांगला घडतो अन्यथा त्या धनाचा आणि त्या पुढाऱ्याचा समाजासाठी काय उपयोग आसा प्रश्न उपस्थित करत भरकटले्ल्या राजकारण्यांचे कान टोचले,
सेवे दरम्यान पुढे बोलताना सोपान महाराज शास्त्री यांनी सांगितले की किर्तनकाराला वेळेचे भान आसले पाहीजे,समोरुण आयोजकांनी घडी दाखविण्या आगोदर किंवा महाराज थांबा म्हणुण सांगण्याची वेळ येण्या अगोदरच सेवेला पुर्णविराम दिला पाहीजे,तसेच मंत्र्यांनी देखील आपल्या वरिष्ठांकडुण हिसकाऊण घेण्या आगोदर किंवा विरोधक किंवा जनता मागणी करत असेल तर सही करुण आपला राजीनामा तयार ठेवला पाहीजे आसे सांगतीले आणि राजकारण्यांच्या कृतीवर नापसंती दर्शविल्याचे दिसुन आले..
सध्या सुरु असलेल्या असामाजीक घटणांवर थेट भाष्य करतानां सोपान महाराज शास्त्री यांनी तिव्र नापसंती व्यक्त करत,ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी दिलेल्या योगदानाची आणि कार्याची आठवण करुण देत,पंकजा मुंडे यांनी त्यांचा वसा आणि वारसा जपवा आशी सुचना यावेळी त्यांनी केली,समाजा समाजा मध्यें ज्यांनी स्वतः च्या स्वार्थासाठी दुरी निर्मान केली आहे ति पंकजा मुंडे यांनी मिटवुण पर्यावरणा बरोबरच बिघडलेले वातावरण देखील टाईट करावे आशी मिश्किल कोटी करत,खरतर पंकजाताई कडे पर्यावरण खात्या ऐवजी चांगले वातावरण निर्माण करणाऱ्या खात्याची जबाबदारी द्यायला पाहिजे होती आसे म्हणत पंकजाताईसह श्रोत्यांमध्ये हास्य निर्माण केले..
यावेळी किर्तनाच्या अंतीम पर्वात सोपान महाराज शास्त्री यांनी त्यांच्या आईवडिलांच्या 22 तारखेला अभिष्टचिंतन सोहळ्याचे अमंत्रण सारडगांव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तां बरोबरच उपस्थित आसलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील देत तुम्ही येणार का नाही आसे थेट विचारत पंकजा ताई ह्या दिलेला शब्द पाळतात आसे मि ऐकुण आहे मग तुम्ही माझ्या आईवडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास येणार ना आसे विचारले यावर मंत्री महोदयांची थोड्या वेळापुरती पंचायत केली होती परंतु पंकजा मुंडे यांनी मी तुम्हाला नंतर कळवते आसे सांगीतले,यावर शास्त्री महाराजांनी परत हाशा पिकवत सांगीतले की बघा हे राजकारणी खुप हुशार आसतात इतका वेळ मी स्तुती केलेला काय उपयोग झाला आसे बोलताचा उपस्थितांसह पंकजाताई देखील खळखळुण हासत होत्या…
रात्री संपन्न झालेल्या किर्तन सेवेत हभप सोपान महाराज शास्त्री सानप यांनी सारडगांव ग्रामस्थ आणि मुंबई मित्रमंडळाचे तोंड भरुण कौतुक करत प्रत्येक वर्षी आधिकाधिक उत्सहाणे संत केदारी महाराज यांच्या सप्ताहा साजरा करतानाचे पाहुण अभिमान वाटतो आणि याच बरोबर सारडगांव ग्रामस्थांचे माझ्यावरील प्रेम देखील कमी न होता उलट आधिक वाढतच जात आसल्याचे कृतज्ञतेने सांगीतले…
सारडगांव ग्रामस्थां कडुण हभप सोपान महाराज शास्त्री सानप व हभप प्रभाकर नाना झोलकर महाराज यांच्या हस्ते शाल श्रिफळ आणि पुष्प हारांनी मंत्री महोदयांचा केला यथोच्छित सत्कार
ग्रामस्थ आणि सोपान महाराज शास्त्री सानप यांच्या विनंती वरुण पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले मनोगत…
सर्वप्रथम मि सारडगांव ग्रामस्थांचे मनापासुन आभार व्यक्त करते,तुम्ही मला अमंत्रीत केलात आणि संत केदारी महाराजांच्या सप्ताहात माझा सन्मान केलात मि गळ्यातील हार जरी काढुण ठेवला आसले तरी तुम्ही मायेने दिलेला हा शालु मी मुद्दामहुण काढलेला नाही तुमचे जसे माझ्यावर प्रेम आहे केदारी महाराजांचे अशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळाले आसुण मी आगोदर हि आणि या पुढेही सारडगांव ग्रामस्थां वरील माया तसुभर हि कमी करणार नसल्याचे सांगीतले….दरम्यान सोपान महाराज सानप यांना त्यांच्या आईवडीलांच्या अभिष्टचिंतण सोहळ्यास येण्याचा शब्द यासाठी दिला नाही कारण त्या तारीखेस माझा शासकीय दौरा आसल्याचे सांगीतले व कोणी काय आहे कसं वागतय हे तुम्ही ठरवा परंतु मी भगवानबाबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराला सोडुण वागले नाही वागत नाही आणि वागणार पण नाही आणि मि कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही करत नाही आणि करणार पण नसल्याचे सांगीतले….
वेगवान मराठी अपडेट परळी केशव मुंडे सारडगांव ता.परळी जि.बीड

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








