“मस्साजोग प्रकरण”बीड मध्ये दाखल होणार नॅशनल ह्यूमन राइट दिल्लीची टिम
Team Bead of National Human Rights Delhi will be filed to investigate the murder of Santosh Deshmukh

देशमुख हत्याकांड: खा.बजरंग सोनवणें यांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात पाठविणार दिल्लीची टिम, राज्य सरकारकडून मागवणार अहवाल, सुरू असलेल्या तपासाची घेणार माहिती
वेगवान मराठी बीड K.D.MUNDE-बीड: 10 जानेवारी २०२५ बीड प्रतिनिधी- मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना माणूसकीला काळीमा फासणारी घटना असून या प्रकरणी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.३ जानेवारी रोजी याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट घेऊन केली होती.
या प्रकरणात आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून आता आयोगही स्वतंत्र चौकशी करणार आहे.
दि.९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा जीव वाचावा,
यासाठी खा.सोनवणे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, त्यांनी फोन घेणे टाळले.
शिवाय केज पोलीसांनी देखील हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. या कालावधीत संतोष देशमुख यांचा मानसिक व शारीरिक छळ करुन हत्या झाली.
संतोष देशमुख यांना इतक्या वाईटपध्दतीने मारहाण केली की शरिरावर एक इंच देखील जागा शिल्लक नव्हती. शिवाय शवाची विटंबना देखील करण्यात आली.
इतक्या अमानुषपध्दतीने मारहाण झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडालेली आहे.
या प्रकरणी, दि.३ जानेवारी रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मस्साजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली.
स्व.संतोष देशमुख कुटुंबियांना मदत मिळऊन देणे बाबत आयोगाला विनंती केली. दि.९ डिसेंबर रोजी मस्साजोग सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अत्यंत अमानवी आहे.
यात मानव अधिकाराचे उल्लंघन झाले असल्यामुळे या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी, अशी आग्रहाची विनंती केली होती.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने खासदारांची विनंती मान्य करुन मस्साजोग प्रकरणात गुन्हा क्र.३३/१३/५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
आता या गुन्ह्यामधील तपास, पोलिस आणि न्यायव्यवस्था यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांचे सुद्धा लक्ष असेल.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये तातडीने टीम पाठवून कारवाई करणार आहे. शिवाय या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार असून ही टीम दिल्ली येथील असेल.
घटनेच्या वेळी अथवा तपासामधे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसा अहवाल देते ..
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला या बाबत कारवाई करण्याचे आधिकार
आयोगाला न्यायिक व अर्धन्यायिक अधिकार आहेत. गुन्हा नोंद करुन घेऊन प्रकरणात गांभिर्याने कारवाई केल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आभार मानले आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.