
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी- के.डी.मुंडे -दि 19 जानेवारी 2025 -रोजीची सकाळ त्या 5 तरुणांसाठी अंतीम काळ ठरली क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते,आई वडिलांनी पाहिलेल्या स्वपन्नांवर पाणी तर फेरले,परंतु वृद्धावस्थे मध्ये आधार देणारे लेकरं पण जिवाशी मुकले हा अपघात एवढा भयानक होता की अक्षरषा मृतांच्या शरीरांचा चेंदामेंदा झालेला असून मानवी मन हेलाऊण टाकणारे फोटो घटनास्थळीचे चित्र आहे (वास्तव चित्र )…
घोडका राजुरी येथील तरुण पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावण्याचा सराव व व्यायम नित्याप्रमाणे करत आसताना तुफान वेग धारण केलेल्या एसटी ने मोची पिंपळगांव फाट्यावर क्षणार्धात केले होत्याचे नव्हतें,
ऐण उम्मदीच्या काळातील तरण्याबांड कोवळ्या वयातील मुलांचा दुर्दैवी घटणेत अंत झाला आहे.
ऐण त्याच वेळी काळ बणुन बीड कडुण परभणी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बीड परभणी गाडीने या मुलांना जोरदार धडक दिली.
या घटने मध्ये तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
परंतु इतर दोघेजणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला.
मयतांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आलेआहे
( मृतांमध्ये सुबोध उर्फ बाळु बाबासाहेब मोरे वय २० वर्ष )
( विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष )
( ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष )
या तिघांचा मृतां मध्ये समावेश आहे.
सदरील घटणा हि मोची पिंपळगांव ठिकाणी घोडका राजुरी परिसरात घडली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.