बंडु मुंडे याच्या कडुण पोद्दार शाळेच्या मुख्याध्यापकास जिवे मारण्याची धमकी
Bandu Munde's death threat to headmaster of Parli

राजस्थानी पोदार स्कुलचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
प्रिन्सिपल ला जीवे मारण्याची धमकी, परळीच्या संभाजीनगर ठाण्यात तक्रार दाखल
ठेवीदारांची माती केली आता विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करणार काय ?
वेगवान मराठी K.D.MUNDE-परळी वैजनाथ : प्रतिनिधी: –राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि परळी येथील ठेवीदारांच्या ठेवींवर उभारण्यात आसलेल्या राजस्थानी पोद्दार लर्निंग स्कुल मध्ये मोठ्या प्रमाणात अर्थिक गैरव्यवहार सुरु असून परळी येथील बाहुबली लोकां कडुण मुख्याध्यापकास धमकाऊण लाखो रुपये बळकावण्यासह,राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यातील फरार असलेलं आरोपी संचालक मंडळ या संस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अफरतफरी करत आहे
विशेष म्हणजे या स्कुल मध्यें नियम ढाब्यावर ठेऊण अवैध रित्या परळी येथील व्यापारी अशोक जैन आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मंदाकिनी बंडु मुंडे यांना या शाळेचा कारभार सोपविण्यात आला असुण,सदरील मुंडे दांपत्य शाळेतील मुख्याध्यापकासह ठेवीदारांमध्ये दहशत निर्माण करत आहेत,
या बरोबरच गंगाखेड येथील बंडु मुंडे हा सोबतीला धस्टपुस्ट शरीरयष्टी असणाऱ्या स्थानीकच्या नेत्याच्या माजी बॉडीगार्डचा मुलाला सोबत ठेऊण कर्मचारी आणि जाब विचारायला गेलेल्या गोरगरीब ठेवीदारां मध्ये भितीचे वातावरण निर्माण करत असल्याचे बोलले जात आहे
या संदर्भात गुन्हे अन्वेशनचे पोलीस निरीक्षक व या प्रकरणाचे तपासाधिकारी शेजाळ यांना ठेवीदारांकडुण निवेदन सादर करून यावर कारवाई ची मागणी करुण देखील कसल्याही प्रकरची दखल घेण्यात आली नाही
त्यामुळे या गुंडाडाला कोणी शाळेवर बसवले आहे ? आणि त्याच्या पाठीशी कोण आहे ? फरार संचालकांचे आणि या मंदाकिनी बंडु मुंडे यांचे काय धागेदोरे आहेत,सदरील व्यकती गंगाखेड वरुण येऊण स्थानीकच्या पिडीत ठेविदारांना वेठीस कसा काय धरु शकतो याचे पाळेमुळे शोधून काढणे आवश्यक आहे
राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने 300 कोटींना चुना लावत ठेवीदारांची माती केली. बियाणी, बाहेती यांना हा प्रकार कमी झाला म्हणून पोद्दार स्कुल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करायची काय ? असा प्रश्न ठेवीदारांसह पालकांना पडला आहे.
नोव्हेंबर 2023 मधे राजस्थानी मल्टिस्टेट पैसे देत नसल्याचे ठेवीदारंच्या निदर्शनास आले. दोन तीन महिने वाट बघितली परंतु पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर सात दिवस साखळी उपोषण केले.
परंतु या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नाही. ठेवीदार हवालदिल झाले. पाहता पाहता चेअरमन चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती यांच्यासह सर्व संचलक मंडळ ठेवीदारांना वाऱ्यावर सोडत फरार झाले.
चंदूलाल बियाणी, बद्रीनारायण बाहेती, प्रेमलता बाहेती, धीरज बाहेती चॅरिटी असलेल्या परळी येथील राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानी पोद्दार स्कुल मधे एकूण 1200 विद्यार्थी हजारो रुपये फीस देऊन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत ठेवीदारांनी शाळेमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. किंवा शाळा बंद पडेल असे वर्तन कधीही केले नाही.
राजस्थानी मल्टीस्टेटच्या प्रकरणात फरार असलेल्या संचालक मंडळाने उंटावरून शेळ्या राखत हि शाळा चालवण्याची जबाबदारी दिलेल्या व्यक्तींमध्ये आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तिळमात्र विचार न करता शाळेतच वादविवाद सुरु करत आपल्या शिक्षण प्रेमाचे दर्शन घडवले आहे.
गंगाखेड येथील बंडु मुंडे यांच्याकडुण परळीतील मुख्याध्यापकास जिवे मारण्याची धमकी. .
पोद्दार स्कुलचे प्रिन्सिपल बी. पी. सिंग यांना पोद्दार स्कुलचे स्वयंघोषित व्यवस्थापक म्हणून घेणारे बंडू मुंडे गंगाखेडकर यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ येथे सिंग यांनी दाखल केली आहे.
या प्रकरणाने राजस्थानी पोदार स्कुलचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून असा प्रकार पोद्दार शाळेत घडत असेल तर विध्यार्थ्यांच्या भविष्याच काय ?
बियाणी, बाहेतींनी राजस्थानी मल्टीस्टेट द्वारे हजारो ठेवीदारांची माती केली, आता पोद्दार स्कुलच्या माध्यमातून बाराशे विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करणार काय ? असा प्रश्न ठेवीदारांसोबत पालकांना पडत आहे.
यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत साहेब यांनी तात्काळ दखल घेवुन संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी ठेवीदारां कडुन विनंती करण्यात येत आहे
वेगवान मराठी परळी बीड K D MUNDE-संपर्क-8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.