क्राईमबीड

आता बीड जिल्ह्यातील संगठीत गुन्हेगारांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई

Organized crime in Beed district to be dealt with under MACOCA

वेगवान मराठी बीड केशव मुंडे दि 27 जानेवाबीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बोड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शथीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मकोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड  जिल्हाचे पोलीस अधिकक  नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली बोड पोलीसांनों सुरु ठेवला आहे.

 

जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोन्या, दरोडे, घरफोडया, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत,

दिनांक 13/12/2024 रोजी फिर्यादी नामे अभिषेक विन्यास डोंगरे बद 25 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. प्रकाश आंबेडकर नगर, बीड यांनी फिर्याद दिली की, दिनांक 12/12/2024 से 13/12/2024 चे रात्री 02.00 वा.सु. मी माझे कुटुंबीय घरात झोपलो असतांना आरोपी नामे अक्षय शामराव आठवले व इतर 05 जनांनी माझ्या घरासमोर येऊन माझे घराचे दरवाजा व खिडकीवर गोळीबार केला,

तेव्हा माझे वडील विश्वास डोंगरे यांनी उठुन दरवाजा उघडला असता त्यांचेचर फ्लॉटच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन 2-3 राऊंड वडीलांच्या दिशेने फायर केले त्यात माझे बडील गंभीर जखमी झाले व माझी चलूती उषा हीचे डोक्याला पिस्तल ठेऊन तुझी पोर कुठ आहेत सांग नाहीतर तुला जिवे करून टाकोन अशी धमकी दिली. बगैर मजकुराच्या फिर्यादी वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचा प्रथम दर्शनी तपास पोनि श्री. अशोक मुदीराज पी स्टे पेठ बीड व त्यानंतर पो.नि. श्री उस्मान शेख, स्थागूशा बीड यांनी केला आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बाराकाईने शोध घेऊन सदर गुन्हयातील आरोपी नामे । अक्षय शामराव आठवले वय 28 रा.मंत्री कॉलनी, माळीवेस, बीड 2. मनिष ऊर्फ प्रतिक प्रकाश क्षीरसागर वय 25 रा. स्वराज नगर बीड 3. ओंकार सिध्दार्थ सवई वय 25 रा. स्नेह नगर, बीड यांना दिनांक 19/12/2024 रोजी 13.28 वा. अटक करुन गुन्ह्यात वापरलेली बर्गर्मन स्कुटी व पिस्टल (गावठीक्डा) जप्त केला आहे.

तसेच 4. प्रसाद मोतीराम धिवार यास दिनांक 13/12/2024 रोजी 11.52 वा. अटक केले आहे. सदर गुन्हा हा एकूण सहा आरोपींनी केला असल्याचे तपासात उघड झाले. तसेच सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या बीड व इतर जिल्ह्यात 19 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

यज्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरोचोरी करणे, अवेधशस्व (गावटीकट्टा) बाळगण, अवैधरीत्या अग्नीशस्त्रांची विक्री करणे, गदी मारामारी करणे, अग्नीशस्त्रे चालविणे, पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून जिवघेणा हल्ला करुन पळून जाणे, सरकारी कामात अडथळा आणने, खंडणो मागणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावात 19 गुन्हे विचारात घेण्यात आले.

त्यापैकी 16 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असून 03 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदर टोळीने हा गुन्हा करण्यापूवों पो.स्टे. शिवाजीनगर, बीड ग्रामीण, केज, पेठ बोड आणि बीड शहर हदीत गुन्हे केले आहेत.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि उस्मान शेख, स्थागुशा, बीड यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 18/01/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता, पोलीस अधिक्षक, श्री नवनीत काँवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 23/01/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.

दिनांक 27/01/2025 रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विरेंद्र मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन नमूद संदभीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. विश्वंभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1)(8), 3(2),3(4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे.

त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी बीड हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत चार आरोपी अटक असुन दोन फरार आहे पोलीस त्याच्या शोधात आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर गोल्डे बीड, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्थागुशा बोड, पोनि श्री अशोक मुदीराज, पोउपनि मुरकुटे, विघ्ने तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, पि.टीचव्हाण, पोह/मनोज वाघ, विकास वाघमारे, राहुल शिंदे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बीड, पोह सुभाष मोठे, पो.स्टे. पेठ बीड यांनी केली आहे.

भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित कॉवत यांनी दिले आहेत.

MCOCA 1999 बेअर ऍक्ट नुसार आठवले गँगवर कारवाई
1 AKSHAY ATHWALE
2 SANNY ATHWALE
3 ASHISH ATHWALE
4 MANISH SHIRSAGAR
5 PRASAD DHIWAR
6 ONKAR SAWAI

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!