दिव्यांगां साठी सरकारची मोठी योजना ऑनलाइन अर्जांची तारीख आणि लिंक
Govt's big scheme for disabled. Last date for online applications ?

बीड, दि. 28 जानेवारी वेगवान मराठी .केशव मुंडे :- सन 2024-25 करीता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुण देण्याची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक 10/06/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,मर्यादित यांच्या स्तरावरुन सुरु आहे.
योजनेचा :-दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध करुण रोजगार निर्मितीस चालना देणे.दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
सर्वसामान्या व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुंटुबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.
योजनेचा लाभ राज्यतील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपीत करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींकडुन ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://register.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर लिंकव्दारे दिव्यांग व्यक्तींनी दि.6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.
सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहनमहाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
वेगवान मराठी बीड -K D MUNDE 28 जानेवारी 8888 387 622 जाहिराती साठी संपर्क

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.