मनोरंजनमहाराष्ट्र

राज्य मराठी चित्रपट महोत्सव ! नामांकने आणि पुरस्कार घोषित

State Govt Marathi Film Festival Nominations Announced

 साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

• तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

वेगवान मराठी बीड के.डी.मुंडे  मुंबई दि. 28 जानेवारी 2025  : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते.

अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडलीत्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल

या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्यापाँडिचेरीसनीधर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे४ ब्लाईंड मेनसमायरागाभह्या गोष्टीला नावच नाहीग्लोबल आडगावहर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड)उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र)उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही)उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव)उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा)उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा)यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोलेविवेक लागूबाबासाहेब सौदागरविजय भोपेश्रीरंग आरसराजा फडतरेशरद सावंतमेधा घाडगेचैत्राली डोंगरेविनोद गणात्राप्रकाश जाधवशर्वरी पिल्लेईजफर सुलतानदेवदत्त राऊतविद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

• सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

• उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

• उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

• उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

• उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

• उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

• उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

• उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!