
अनुदान तत्वावर शेळीगट वाटप
31 जानेवारी पूर्वी अर्जाचे आवाहन
बीड, दि. 28 जानेवारी वेगवान मराठी केशव मुंडे :- जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बीडमार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के जिल्हा परिषद सेस निधीतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्वावर शेळी गट वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज पंचायत समितीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
अर्ज जमा करण्याची अंतिम तारिख 31 जानेवारी 2025 असून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. लाभार्थ्यांची निवड तालुका निहाय लकी ड्रॉ पध्दतीने केली जाईल तरी सर्व तालुक्यातील पात्र मागासवर्गीय लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कलयाण अधिकारी यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.