
तो आला त्याने पाहिले आणि सावज टप्यात घेउण सोनपेठ येथील महिलेचे 8 तोळे सोन्याचे दागिने अंबाजोगाई बसस्थानकात बस मध्ये चढतानीच चोरले
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी दिनांक 2 फेब्रुअरी अंबाजोगाई : लग्न समारंभ आटोपून गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील बसस्थानकात 2 फेब्रुअरी रविवारी सायंकाळी 7 वाजता घडली.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील गुलाबशहा राणी गयासोद्दीन मन्यार हि महिला पतीसह परंडा येथे एका लग्न समारंभाला गेल्या होत्या.
लग्नाहुण परत येती वेळी त्या पंढरपूर-अंबाजोगाई बसने अंबाजोगाईतील नगरपालिकेच्या उद्यानासमोरील पर्यायी बसस्थानकात उतरल्या.
त्यानंतर माजलगाव गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सवर डल्ला मारला.
या पर्समध्ये आठ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने खाली उतरून परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा पसार झाला होता.
यानंतर त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन घेण्यात आला असून चोराचा शोध सुरू आहे
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारांच्या विरोधात टोकाचे प्रयत्न करत आहेत परंतु घटनाक्रम थांबण्याचे नाव घेत नाहीत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.