
वाळुचा व्यवसाय करणाऱ्या 51 इसमांना पोलीस अधीक्षक,बीड यांनी अवैध वाळु वाहतुक करणार नाही याबाबत सक्त सुचना देवुन 26 इसमांवर केली प्रतिबंधक कारवाई
********************************************************************************
वेगवान मराठी बीड केशव मुंडे –आज दिनांक 01/02/2025 रोजी मा.श्री. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक,बीड यांनी जिल्हयातील अवैध वाळु उपसा करुन चोरटी विक्री करणारे अभिलेखावरील 51 इसमांना पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड येथे बोलावुन घेउण आगोदर त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
तसेच कोणीही यापुढे अवैधरित्या वाळुची तस्करी, चोरटी वाहतूक करणार नाही,
तसे आढळुन आल्यास त्यांचे विरुध्द हद्दपार, MPDA, मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल याबाबत सुचना दिल्या आहे.
तसेच यातील 26 इसमांविरुध्द अभिलेख पाहणी करुन प्रतिबंधक कारवाई केली असून
26 इसमांनी बाँडचे उल्लंघन केल्यास त्यांचे बाँन्डची रक्कम शासन जमा करण्याची कारवाई केली जाईल याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.
पोलीस अधीक्षक बीड
प्रति-संपादक वेगवान मराठी

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.