
!! परळी तालुक्यातील नागापुर गावातील दलित युवकास जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहाण !!
!! परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत 5 जनांवर गुन्हा दाखल !!
( दि.24 मे 2025 -वेगवान मराठी & न्युज नेटवर्क प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वै.बीड ) परळी तालुक्यातील -नागापुर येथील दलित युवकास जातीवादी टोळक्याने दुचाकीने कट का मारलास या क्षुल्लक कारणावरून नागापुर कॅम्प येथील रोहीत बनसोडे या तरुणावर हल्ला करीत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच रसत्या लगत पडलेल्या वीटा व काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध -परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत परळी ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील फिर्यादी रोहीत उमाकांत बनसोडे वय 20 रा. नागापुर कॅम्प ता. परळी वै. यास नागापुर गावातीलच आरोपी 1) धनराज बंडु सोळंके, 2) राम सुंदर सोळंके,3) कृष्णा सोळंके, 4) सुनिल सोळंके, 5) उध्दव सोळंके
यांनी नागनाथ मंदिरा समोर दचाकीला कट मारल्याच्या कारणा वरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी,रस्त्यावर पडलेल्या विटां आणि काठीने मारहाण करून जखमी करत.
फिर्यादी पिडीत रोहित बनसोडे आणि त्याच्या सहकारी साक्षीदारांना गावातून उठवुन लावण्याची धमकी प्रस्थापीत गावगुंडां कडुण देण्यात आल्याचे तक्रारी मध्ये नमुद करण्यात आले आहे .
अशा अशयाच्या फिर्यादीवरून पाच आरोपीं विरुद्ध गुरनं 227/2025 कलम 118(1), 115(7). 352. 351(2), 351(3),189(2),190,191(2)BN S सह कलम 3(1)(r),3(1) (s), 3(2) (va) आताच्या नवीन अ.जा.प्र.कायद्या प्रमाणे संबंधित आरोपींवर परळी ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके अंबजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








