
वेगवान मराठी परळी प्रतिनिधी- दिनांक-19 नोव्हेंबर 2024 –सार्वत्रिक निवडणूका महाराष्ट् विधानसभा 2024 चा पोल काढणे ब्रम्हदेवाला पण शक्य नाही म्हटलें तर चुकीचे ठरणार नाही, त्यास कारण हि तसेच भक्कम आहे….
सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभेचा निकाल पाहता सर्वसामान्यांसह राजकीय पंडीतांची धारणा होता की येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत देखील लोकसभे प्रमाणेच प्रस्थापीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनतेचा कौल राहील आणि विरोधी पक्षाची सत्ता येईल आणि काही थोड्या मोजक्या मतदारसंघात लोकप्रतिनिधीच्या वर्तनावर आणि कार्यावर समाधान असणारे मतदार सत्ताधारी उमेदवाराला पसंती देतील,या पलीकडे कोणाच्याही बुद्धीचे पैरामीटर जात नव्हते,
दरम्यानच्या काळात ऐण फौर्म काढण्याच्या दिवशी या निवडणुकीतील प्रमुख कळीचा मुद्दा ठरलेल्या मराठा आरक्षण समितीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी अनपेक्षितपणे अचानक माघार घेऊण निवडणुकीतील पाचर काढुण घेतल्यानें महाविकास आघाडीने अगोदर लाऊण ठेवलेले गणित कोलमडले,यामुळे आघाडीच्या अनेक मतदार संघातील उमेदवारी देण्याचे अंदाज फसले गेले, ज्यां इच्छुकांना नादाला लाऊण ऐणवेळी नाकारले गेले त्यांना समजाउण कामाला लावण्यात आलेले अपयश, ! मनोज जरांगे यांच्या भुमिकेवर बोट ठेऊण ओबीसी नेत्यांनी घेतलेली आक्रमक भुमिका,! मराठा समाजाची झालेली संभ्रमावस्था !,या सर्व घटना सत्ताधारी पक्षाच्या पथ्यावर पडल्या,आणि लोकसभा निवडणुकी पासुण बैकफुटवर गेलेले युती सरकार परत मैचमध्ये आले…
हातामधुन गेलेला सामना परत आल्याचे लक्षात येताच भाजपाच्या चाणाक्षयांनी संधीचा फायदा घेत नरेंद्र मोदी,अमित शहा,यांच्या सभेंना रोख लावला तर देवेंद्र फडणवीस,आणि त्यांचे वाचाळवीर बिळात कोंडुण,भाजपच्या निर्णयप्रक्रिये पासुण बाजुला ठेवलेल्या आणि राजकीय वनवासाला पाठवलेल्या परंतु लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्या बरोबरच विरोधकांना ज्यांच्यावर टिका करायला मुद्दा नसलेल्या,नितिन गडकरी,आणि पंकजा मुंडे या दोनच नेत्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणले गेले याच बरोबर शिवसेनेतुन बाहेर पडुण देखील कामाच्या माध्यमातुन जनतेच्या मनात आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या मुख्यमंत्राी एकनाथ शिंदे आणि युपीचे मुख्यमंत्राी योगी आदित्यनाथ यांना हिंदुबाहुल मतदारसंघासह उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचाराला उतरवण्यात आले,
- दरम्यान युतीचा तिसरा प्रमुख भाग असलेल्या आजित पवार आणि त्यांच्या पक्षातील स्टार प्रचारकांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या प्रचारापासुण चार हात दुर ठेवण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न केला गेला आहे ही बाब जेवढी लपुण राहिली नाही तेवढीच निकाला नंतरचे चित्र काय असेल हे दाखवणारी देखील आहे,जसे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी आजित पवार यांच्या गटाला अस्पृष केले तसे आजित पवार यांच्या कडुण मात्र आजिबात झाले नाही,उलट बीड जिल्ह्यसह मराठवाडय़ातील प्रत्येक मतदार संघात पवार गटाला पंकजा मुंडे यांच्या सभेची आणि भाजपाच्या ताकदीची प्रकर्षाने गरजच भासली नाही तर,त्यांच्याच मतदारांवर बरीच भिस्त अवलंबुन राहिल्याचे उघड झाले आहे..
- लोकसभा निवडणुकीतील हवा डोक्यातुन निघायला झालेला उशीर आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला गृहीत धरून केलेली व्यूह रचन महाविकास आघाडीला 145 चा जादुई फिगर गाठण्या पासुण रोखु शकत नसली तरी आशवासक परस्थिती देखील नाही परंतु याचा अर्थ असा ही होत नाही की युती हा आकडा गाठु शकेल,युती आणि आघाडी पैकी कोणीही संपुर्ण बहुमतांने सत्तेवर येईल आशी शक्यता महाराष्ट्रात आज नाही मात्र आघाडीला युतीपेक्षा आधीक जागा मिळतीलच, मात्र तो फरक मोठा असू शकणार नाही…
- असे असेल पक्षीय बलाबल
- भाजपा 60–70 ¶ एकनाथ शिंदे 25- 35 ¶ आजित पवार 20–30 ¶ एकुण युती = 135 च्या आसपास…
- कांग्रेस 45–55– ¶ उद्धव ठाकरे 40-50 ¶ शरद पवार 35-45 एकुण =150 च्या आसपास
- यामध्यें किमान जागा आल्या तर अपक्षांचे म्हत्व वाढु शकते आणि कमाल जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर आघाडीतील घटक पक्षाला म्हत्व प्राप्त होऊण मुख्यमंत्राी पद हे कळीचा मुद्दा बनु शकते…
- बीड जिल्हा
- बीड जिल्ह्यातल्या 6 जागांपैकी बीड आणि परळी मतदार संघात आजित पवार यांची घडी बसु शकते,
- माजलगांव मध्ये अपक्ष उमेदवाराचा हाबाडा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे परंतु मतविभाजणाचे गणित प्रस्थापीत उमेदवाराच्या पथ्यावर देखील पडु शकते,
- गेवराईत मराठा आणि ओबीसीच्या लढाईत ओबीसी उमेदवार बाजी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे
- आष्टी मध्ये भाजपाचे सुरेश धस एकतर्फी विजयी होतील आसे वाटणारी निवडणुक चौरंगी होऊण बसली आहे अपक्ष भिमराव धोंडे,घडीचे बाळासाहेब आजबे,आणि तुतारीचे मेहबुब शेख असा सामना रंगल्यामुळे,सुरेश धस एकतर काटावर पास होतील किंवा मग हुरहुर लावणाऱ्या अल्प मतांनी पराभुत होतील..
- केज मतदार संघात नमिता मुंदडा यांची सामान्य जनतेशी अनटचेबल ईमेज,लोकसभा,निवडणुकीत हातचा राखुण केलेला प्रचार,आणि विकासकामां पेक्षा स्वताचा केलेला सर्वांगीन विकास मतदारांच्या पचनी पडला नसुण पृथ्वीराज साठे यांना या निगेटिव्ह मतांसह मराठा मतदारांचा फायदा होऊ शकतो…
- बीड जिल्ह्यातील आष्टी,बीड,आणि केज वगळता उर्वरित माजलगांव,गेवराई,आणि परळी मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ मतदार हे मतदार संघ सोडवुण घेण्यासाठी मतदान करणार की युतीधर्म पाळण्यात धन्यता मानुण मिळालेल्या चिरीमीरीवर समाधान बाळगुण मतदान करणार हा विषय देखील या मतदार संघांसाठी निर्णायक ठरणार आहे…
टिप:– आम्ही जनतेत जाऊण त्यांच्या मतांवर आमचे बनवलेलं मत आहे एक शक्यता आहे,यात कोणाला फायदा किंवा नूकसान व्हावे हा हेतु मुळीच नाही !

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.