
बीड मध्ये मल्टीस्टेट नंतर आणखी एक महाघोटाळा समोर आला आहे ! एका सोने व्यापाऱ्याने नकली सोन्याचे बिस्किटे विकुण बीड मधुन धुम ठोकली आहे
वेगवान -मराठी प्रतीनिधी (केशव मुंडे बीड ) दिनांक : 11 फेब्रुवारी 2025 -अगोदरच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेल्या आणि मल्टिस्टेटने गंडविलेल्या बीड जिल्ह्यात आता आणखी एक सोने घोटाळा समोर आला आहे. बीडमधील व्यापारी ‘विलास उदावंत या’ व्यक्तीने बीड शहरातील अनरेक व्यापाऱ्यांना ‘तुम्हाला मुंबई भावाने सोने देतो’ म्हणत चक्क सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची बिस्किटे देऊन प्रकरण उघडकीस येताच धुम ठोकली आहे
दरम्यान हा विक्रेता’ आता गायब झाल्याने अनेकांना डोके धरून बसण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे सोने घेणारांनी देखील ते नंबर दोनचे म्हणूनच घेतले होते त्यामुळे आता गंडवले गेल्यानंतरही त्याबद्दल कोठे बोलण्याची सोय नसल्याची परिस्थिती असल्याने त्यांची अवस्था हि आता “मुकी . . . ‘हाक ना बोंब'” अशी झाली आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही वर्षात अनेक घोटाळे समोर आले आहेत. जिल्ह्यातील लाखो लोकांना अगोदरच काही मल्टिस्टेटवाल्यानी गंडा घातला आसुण अनेक ठेविदारांनी आत्महत्या केल्या आहेत, ठेवीदारांचा विषय कायदेशीर असुण देखील त्यांची दखल घेण्यासाठी सुरेश धस वगळता एकही लोकप्रतिनिधी समोर येत नाही हि बीडच्या जनतेसाठी अत्यंत खेदजनक बाब आहे !
आता हा नविन घडलेला घोटाळा तर बेकायदेशीर आहे त्यामुळे न्याय मिळण्याची कल्पनाच न केलेली बरी अशी एकूण अवस्था जनतेची झाली आहे त्यामुळे बाजारपेठेला हा एक मोठा फटका आहे.
असे असतानाच आता शहरातील यापाऱ्यांसह अनेकांना सोन्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे.
बीडमध्ये सोन्याचा व्यापार करणाऱ्या ‘विलास उदावंत या व्यक्तीने अनेकांना ‘तुम्हाला मुंबईच्या भावात सोने देतो’ म्हणून भुरळ घातली. त्याने सुरुवातीला काही लोकांना सोने दिले देखील. हा उदावंत व्यक्ती इतका उदार’ होता, की त्याने दिलेल्या सोन्यावर एका वित्तीय संस्थेने गोल्ड लोन सुद्धा दिले. त्या मुळे आता बीडच्या बाजारपेठेत त्याची चांगलीच चर्चा होत आहे .
जीएसटीची कटकट नको, कोणते कागदपत्र नको म्हणून अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या ‘विलास ‘उदा’वंत’ व्यक्तीकडून मोठ्याप्रमाणावर सोन्याची बिस्किटे खरेदी केली आसल्याची माहिती समोर येत असून कोणी दोन, कोणी पाच तर ज्याला जशी जमतील तशी सोन्याचे बिस्किटे, यांच्याकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
आता त्याने दिलेले सोनेच चक्क बनावट असल्याचे सांगितले जात आहे. जी बिस्किटे सोन्याची म्हणून देण्यात आली, ती प्रत्यक्षात तांब्याची असून त्याला केवळ सोन्याचा मुलामा दिलेला असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणात आपली फसवणुक झाल्याचे सर्वांनाच समजले आहे.
मात्र मागच्या काही दिवसांपासून तो ‘विलासी’ व्यक्ती बीड मधुन पळुन गेला असून त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहित नाही. त्यामुळे आता बोलायचे.तरी कोणाला हा प्रश्न व्यापाऱ्यांना देखील पडला आहे.
विशेष म्हणजे हा सारा मामला नंबर दोनचा, त्यामुळे ना बिले ना पावत्या, दाद मागायची तरी कशी आणि कोठे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे !
हे सारे पैसे अर्थातच सरकारपासून लपविले, त्यामुळे तक्रार करायला जावे तर नवीनच खेंगटे मागे लागायचे त्यामुळे या फसवणुकीवर कोणी मोकळेपणाने बोलायला देखील तयार नाही.
दागदागिने बनवण्याची मजुरी अल्प घेऊण जिंकला होता ग्राहकांचा विश्वास
हा ‘विलास’ उदा’वंत’ सोन्याच्या कामावर मजुरी देखील अत्यल्प घ्यायचा. ज्यावेळी बाजारपेठेत एका ग्रामसाठी किमान ५०० रुपये मजुरी आकारली जायची, त्यावेळी हा चक्क ग्राम साठी १०० रुपये इतकीच मजुरी आकारायचा असेही सांगितले जाते. त्यामुळे देखील त्याच्याकडे अनेकांचा ओढा होता.
आता त्याने असे कोणाकोणाला गंडविले आहे आणि त्याने दिलेले दागिने नेमके कशाचे आहेत हे देखील ज्याचे त्याने तपासण्याची वेळ आली आसुण भविष्यात फसवणुक झालेल्यांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यकत करण्यात येत आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.