दादा खिंडकर आणि समाधान खिंडकर या सख्या भावांची हर्षुल मध्ये रवानगी
Dhananjay Deshmukh's guests—the Khindkar brothers—have been sent to Harshul; why under the MPDA?

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा दोन गुंडांना दणका ! (बीड तालुक्यातील दोन धोकादायक गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्मुल कारागृहात रवानगी)
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 27 जुन 2026-बीड –बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे.
बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA व MCOCA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे,
त्या अनुषघांने पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांच्या सुचनेवरुन स.पो.नि. पिंपळनेर यांनी
दि. 17.06.2026 रोजी इसम नामे दादासाहेब बाबुराव खिंडकर वय 35 वर्षे रा. बेलवाडी ता. जि. बीड व पो.नि. शिवाजीगनर यांनी इसम नामे समाधान बाबुराव खिंडकर वय 30 वर्षे रा. बेलवाडी ता. जि. बीड हमु उत्तम नगर, बीड यांचे विरुध्द
दिनांक 12.06.2026 रोजी MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यावायतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब वीड यांना सादर केला होता.
अनु क्र.। प्रस्तावित स्थानबध्द इसमा विरुध्द पो.स्टे. पिंपळनेर व इतर पो.स्टे.ला खुनाचा प्रयत्न करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे, दरोडा टाकणे, रस्ता आडविणे,
कट रचणे, शिवीगाळ करणे, सरकारी नौकरांवर हल्ला करणे, दुखापत करणे, दंगा करणे, नुकसान करणे, महिलांची बदनामी करणे, या व अशा स्वरुपाचे एकुण 06 गंभीर गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलम 126 बीएनएसएस प्रमाणे दिनांक 24/04/2026 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात कसल्याही प्रकारची सुधारना झाली नव्हती.
अनु क्र.2 पस्तावित स्थानबध्द इसमाविरुध्द पो.स्टे. शिवाजीनगर व इतर पो.स्टे.ला खुनाचा प्रयत्न करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गंभीर दुखापत करणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे,
मालमत्तेचे नुकसान करणे, कट रचने, जिवे मारण्याच्या उद्देशान हल्ला करणे, पातक हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी करणे, दंगा करणे, आडवुण दुखापत करणे, शासकीय मालमत्तेची तोडफोड व जाळपोळ करणे,
बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, सोशस मिडीयावर महीलांची बदनामी करणे, शिवीगाळ करणे या व अशा स्वरुपाचे एकुण 06 गंभीर गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलम 126 बीएनएसएस अन्वये दिनांक 27.04.2026 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात कसल्याही प्रकारची सुधारना झाली नव्हती.
सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 26.06.2026 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर दोन्ही ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून
हसुंल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केरले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून
कार्यवाही करण्याच्या सुचना संबधित पो. स्टे. प्रभारी अधिकारी व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या, त्यावरुन पोनि शिवाजी बंटेवाड स्थागुशा बीड यांनी ताचे पोलीस अंमलदार मार्फत अनु क्रं. 1 यास दिनांक 26.06.2026 रोजी ताब्यात घेऊन पो.स्टे. पिंपळनेर येथे हजर केल्याने
त्याला दिनांक 26.06.2026 रोजी 23.44 वा. सपोनि पिंपळनेर यांनी कायदेशीर ताब्यात घेऊन मुदतीत स्थानबध्द केले आहे. तसेच अनु क्र.2 यास पोनि स्थागुशा यांनी ताबे पोलीस अंमलदार मार्फत दिनांक 26.06.2026 रोजी पुणे येथे ताब्यात घेऊन
दिनांक 27.06.2026 पो.स्टे. शिवाजीनगर येथे हजर केल्याने पोनि शिवाजीनगर यांनी दिनांक 27.06.2026 रोजी 05.30 वा. त्यास कायदेशीर ताब्यात घेऊन 10.25 वा. हार्मुल कारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भापोसे), अ.पो.अ. बीड श्री. समीर शेख, उविपोअ तथा सहायक पोलीस अधीक्षक केज चार्ज बीड श्री वेकंटराम, पोनि स्थागुशा श्री. शिवाजी बंटेवाड, यांचे मागदर्शनाखाली पो. नि. शितलकुमार बल्लाळ, सपोनि विजय नरवाडे, सपोनि लंके, पोउपनि गोलवाल, आत्माराम गर्जे, पोअं/संतोष राऊत, शिवदास घोलप, विलास कांदे, मराडे, जाधव, सादेक पठाण, पवार, विघ्ने सर्व पो.स्टे. शिवाजीनगर व पिंपळनेर तसेच सपोनि जारवाल पोउपनि सुशांत सुतळे सपोउपनि अभिमन्यु औताडे, अशोक दुबाले, मनोज परझने, अश्पाक सय्यद,
अतुल हराळे, राहुल शिंदे, वाघ, गायकवाड, सानप, मांजरे, अश्वीन सुरवसे, शेख अलीम, विबीषण चव्हाण नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.
भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या,
खंडणी बहादर धोकादायक गुंडावर, बेकायदेशीर जुगार, लॉटरी व हातभट्टीचे दारुचा व्यवसाय चालवणारे व्यक्तीवर जास्तीत जास्त MPDA व MCOCA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भापोसे) यांनी दिले आहेत,

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








