
( खुनाच्या गुन्हयातील आरोपीस बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक)
वेगवान मराठी प्रतिनिधी दिनांक 30 जुन 26 -चार दिवसांपुर्वी केज येथील विलास घुले या तरुणाची भोसकुण हत्या करण्यात आली होती त्या घटनेची धुळ बसते की नाही तो पर्यंत काल माजलगाव तालुक्यातील तालखेडा येथील सासरी घरजावाई म्हणुन राहणाऱ्या विकास वाघमोडे वय ३३ या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे
सततच्या गुन्हेगारी घटणांमुळे जिल्ह्यातील सामाजीक सलोखा टिकवुण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासणास तारेवरची कसरत करावी लागत आहे..
पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण हद्यीत तालखेड गावात मयत ईसम नामे विकास दत्तात्रय वाघमोडे वय 33 वर्षे रा. तालखेड यांचे प्रेत त्यांच शेताजवळ दि. 29/06/2026 रोजी मिळून आले होते.
यावरुन पो.स्टे. माजलगाव ग्रामीण येथे गु.र.नं 293/2026 कलम 103(1) भा.न्या. सं अन्वये अज्ञात ईसमाविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड हे करीत होते.
दि.29/06/2026 रोजी पोउपनि महेश विघ्ने यांचे पथकाने गुन्हयाचा घटनास्थळास भेट दिली व अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला होता.
आरोपीचा शोध घेत असताना पोउपनि विघ्ने यांना माहीती मिळाली की, मयत ईसम नामे विकास वाघमोडे यांचे काही दिवसापुर्वी आदित्य बारवाळ याचे सोबत जोरदार भांडण झाले होते व आदित्या याने मयत विकास यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
यावरुन आदित्य बारवाळ यास स्था.गु.शा पथकाने ताब्यात घेवुन विचारपुस करण्यास सुरुवात केली
. आदित्य बारवाळ याने चौकशी दरम्याण सांगितले की मयत विकास वाघमोडे याने पुणे येथे मारहाण केली होती
तसेच पंधरा दिवसापुर्वी तालखेड फाटा येथे भांडण करुन अंगावर कुन्हाड घेवुन मारण्यास धावून आला होता व त्याने मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. दोन्ही भांडणाचा राग मनात धरुन मी विकास यास ठार करण्याचे ठरवले होते.
यावरुन मयत विकास याचा दि.28/06/2026 रोजी रात्रीचे वेळी 11.00 वा सुमारास त्याचा गावातुन पाठलाग करत त्याचे मागे त्याचे शेताकडे जाणाऱ्या रस्ताने जावुन त्यास एकटा पाहुण त्यास अडवुन त्याचे पोटावर दोन व गळयावर एक वार चाकुने करुन त्यास ठार केले व घरी आलो असे सांगितले.
सदरचा गुन्हा त्याने कबुल केल्याने त्यास पुढील कारवाई कामी पो.स्टे. माजलगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर खुनाच्या गुन्हयात अज्ञात आरोपी स्था.गु.शा बीड ने निषन्न करुन त्यास अवघ्या बारा तासाच्या आत अटक केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, मा. पोलीस उपअधिक्षक श्री. ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, पो.स्टे. माजलगाव ग्रामीण प्रभारी पोनि विजयकुमार रामोड, पोउपनि महेश विघ्ने, पोह/बप्पासाहेब घोडके, पोह/महेश जोगदंड, पोह जफर पठाण, पोह/दिलीप गित्ते, चापोह गणेश मराडे यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








