
परळी वैजनाथ -दिनांक २६ जुलै २०२६ कै.गंगाधर राम आघाव यांचे अल्पशा आजाराने काल परळी येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली तीन नातवंडे असा भरगच्च परीवार आहे
अत्यंत शांत प्रिय माणूस व्यक्तीमत्व असल्याने परीवार नातलग मित्र परिवार आणि ग्रामस्थां मध्ये दुखमय वातावरण आहे
परळी तालुक्यातील सारडगाव जन्म भुमी असलेल्या कै.गंगाधर आघाव यांनी सारडगांवातील 8 युवकांना थर्मल पॉवर स्टेशन मध्ये गेलेल्या स्वतः ची जमीन देऊन धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळवून दिले होते
सारडगांवातील ते आठ हि तरुण आज थर्मल मध्ये नौकरीला आहेत मातृभुमीबद्दलचे त्यांचे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यातुनच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते
अयुष्यात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून काल गुरुवार एकादशी च्या दिवशी त्यांना आपला देह ठेवण्याचा ईश्वराने योग जुळवून आणला हे भाग्य केवळ पुण्यवंत आत्म्यालाच लाभतं
त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम वैद्यनाथ सार्वजनिक स्मशान भूमी परळी वैजनाथ येथे शनिवारी सकाळी ७ वाजता होणार आहे.भावपुर्ण श्रद्धांजली 🌹

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








