
वेगवान मराठी बीड शिरुर कासार दिनांक:-05/03/2025 • मी रेणुका संदीप बळे वय-30 वर्ष व्यवसाय-शेती व मजुरी रा. निमगाव ता. शिरुर (का) जि.बीड (जात-कहार) मो.नं-9403483793
समक्ष पोलीस स्टेशन चकलंबा येथे हजर येवुन तोंडी सांगुन फिर्याद देते कि, मी वरील ठिकाणची राहणारी असुन शेती करुन पोट भरते. मी माझे पती संदीप, सासु सुनंदा बळे व सासरे गुलाब बळे असे मुला बाळासह निमगाव शिवारातील शेत गट नं. 410 मध्ये राहतो व आम्हाला शासनाकडून मिळालेली जमीन करुन पोट भरतो.
दिनांक-05/03/2025 रोजी 11.00 वाजण्याचे सुमारास मी माझे घरी काम करीत असताना आमचे घराचे शेजारी राहणारे 1. दत्ता नामदेव शिंदे 2. गणेश नामदेव शिंदे 3. बारकाबाई नानासाहेब पवार सर्व रा. निमगाव ता. शिरुर (का) जि. बीड हे आमचे शेतातील कांदयाचे पिकात त्यांची कोपी टाकण्यास सुरु केली तेव्हा मी त्यांना तुम्ही मालकीच्या शेतात व कांदयाच्या पिकात कोपी का टाकता तुम्ही इथे कोपी टाकु नका असे म्हणताच मला दगड गोठ्यानी मुका मार दिला
व गणेश शिंदे याने शिवीगाळ केली. मी त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हणताच तिघांनी मला लाथाबुक्याने मा करुन मुका मार दिला व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या,
त्यानंतर मी घरासमोरच उभी राहुन त्यंना तुम्ही आमच्या शेतात कोपी टाकू नका असे म्हणताच दत्ता नामदेव शिंदे याने आमचे घराला चिटकुन असलेला जनावरांचा गोठा काड्याचे पेटीने पैटून दिला तेव्हा गोठ्यात दोन जरशी गाया होत्या व एक गाय गोठ्याचे बाहेर बांधलेली होती मी गोठ्याचे बाहेरची गाय लगेच सोडली व गोठ्यातील क गाय सोडवत असताना ती बरीच होरपळली आहे.
व जरशी गाय किंमती अंदाजे 20 हजार रुपयांची जागीच जळुन मरण पावली. गेाठ्याने मोठा पेट घेतल्याने तो विझवता आला नाही त्यावरुन मी लगेच माझे पती सासुस सासरे यांना शेतातुन बोलावनु घेतले
तोपर्यंत आमच्या दगड गोठ्यातील गाय जळालेली होती. माझे घरी असताना आमचे गावातील 1. दत्ता नामदेव शिंदे 2. गणेश नामदेव 3. बारकाबाई नानासाहेब पवार सर्व रा. निमगाव ता. शिरुर (का) जि.बीड यांनी आमचे शेतात कोपी टाकत असताना रोखले आसता
मी त्यांना कोपी टाकण्या पासुन थांबविले असता त्यंनी मला लाथाबुक्याने मारहाण करुन मुका मार दिला व शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व आमचा जनावरांचा गोठा दत्ता नामदेव शिंदे याने पेटुन देन गोठ्यातील एक जरशी जातीचे गाय किंमती 20 हजार रुपयांची आगीत होरपळून जागीच जिवे मारली म्हणुन वरील लोकां विरुध्द फिर्याद आहे.
वरील फिर्याद माझे सांगणे प्रमाणे घेतली असुन ती मला माझे पती संदीप बळे यांनी वचुन दाखविली ती बरोबर आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.