खाटीक समाज परिवर्तन संघटना महिला शाखेतर्फे जागतिक महिला दिन साजरा

वेगवान मराठी
अमरावती (प्रतिनिधी):- 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून स्थानिक एकविरा सभागृह खरकाडीपूरा,येथे खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या मुख्य शाखा,बेलपुरा व महाजनपुरा शाखा ई.महिला शाखांतर्फे 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना हरणे माजी नगरसेविका,तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजली दहात आहारतज्ञ जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती,कुसुमताई साहू माजी महापौर, गंगाताई अंभोरे माजी सभापती,संगीता बुरंगे, सुनीता भेले,हरमकर ताई,अतकरे ताई या होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया नेहर व संचालन राखी गायगोले यांनी केले.या कार्यक्रमात लहान मुलींनी साकारलेली इतिहासकालीन महिलांची वेशभूषा हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.यावेळी आहारतज्ञ अंजली दहात यांनी स्त्री आरोग्य, आहार,व आहारतालिका ई.बाबत मोलाचे मार्गदर्शन केले तर वंदना हरणे यांनी बचत गट,शिक्षण,व महिला एकसंघ राहणे ई बाबत आपले विचार व्यक्त केले,कुसुमताई यांनी स्त्री सशक्तीकरण बद्दल माहिती दिली.यावेळी नंदुभाऊ हरणे अध्यक्ष तसेच संघटनेच्या सर्व शाखांचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या मुख्य शाखा(महिला व पुरुष),बेलपुरा व महाजनपुरा शाखा(महिला व पुरुष) पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले
