छत्रपती संभाजी नगर

जनावरांना कोंबून अवैध रीत्या वाहतूक;-सोयगाव शहरातील सायंकाळची घटना

वेगवान मराठी

सोयगाव शहरातून शेंदूरणी कडे दोन (गोऱ्हे)  जनावरांची वाहनात कोंबून क्रूरपणे विनापरवाना वाहतूक करताना शनिवारी सायंकाळी चार वाजता सोयगाव शहरातील सोना नदीच्या पुलावर काही सजग गो-सेवकांनी पाठलाग करत वाहन पकडले असता, या वाहनात दोन जनावरे(गोऱ्हे) विनापरवाना क्रुर पणे वाहतूक करतांना आढळून आले असता पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सोयगाव पोलिसांनी या कारवाईत दोन लाख पन्नास हजार रु चे टाटा ace वाहन आणि चार हजार रुचे दोन्ही गोऱ्हे असा एकूण दोन लाख ५४ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान दोन्ही जनावरांना(गोऱ्हे) आमखेडा येथील अंजनाई गोशाळेच्या स्वाधीन केले आहे
  सोयगाव शहरातून सोना नदीच्या पुलावर टाटा कंपनी चे छोटा हत्ती वाहन क्र-एम एच-०३ सी डी-०५४७ हे जनावरांची क्रूरपणे वाहतूक करतांना गो-सेवक शंकर जेठे, संदीप इंगळे, नीलेश नागपुरे आदींचा लक्षात हा प्रकार येताच वाहन चालकांला हटकले घटनास्थळी तातडीने पोलिसांना बोलाविण्यात आले दरम्यान पोलिसांच्या चौकशी मध्ये वाहन चालक शकील नवाब सम्मद (वय-५०)रा. शेंदुर्णी ता. जामनेर हा विना परवाना वाहनामध्ये दोन लाल रंगाचे गीर जातीचे गोऱ्हे( वय बारा महिने) चारा पाण्याची सोय न करता भरण्यासाठी पुरेशी जागा नसतांना क्रूरपणे वाहतूक करतांना आढळून आले याप्रकरणी वाहनचालक शकील नवाब सम्मद( वय-५० रा. शेंदुर्णी ता. जामनेर) व राजु विठ्ठल दांडगे, बय 20 वर्षे रा. सोनसवाडी( ता. सोयगांव) या दोघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात कलम ११ (ड) (ई) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व सह कलम १३० (१) (३)/१७७ मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक गजानन आरेकर, उपनिरीक्षक गणेश झलवार,जमादार राजू बर्डे,अजय कोळी,रवींद्र तायडे,आदी करत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!