
तुला खल्लासच करतो म्हणत दलित तरुणाला मारहाण!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे दिनांक 19 मार्च 2025 बीड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक घटणांची मालिका सुरु आसुण काही केल्या गुन्हेगारी आणि मारामारी खुन आणि दहशत दादागीरीच्या घटणा वारंवार घटत आसल्याचे बीड ला आवाहानात्मक घेतलेल्या बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या समोर आव्हानाचेच आव्हान निर्माण झाले आहे…
आगोदरच जातीवादाच्या अग्निकुण्डात होरपाळुण निघालेल्या बीड जिल्ह्याला गुन्हेगारीने ग्रासले आसुण बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि सर्वच जातीधर्मातील गुन्हेगार एक एक करुण समोर येत आहेत.हि बाब सामाजिक सलोख्याच्या दृष्ठीणे हानीकारक आसुण कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे
काय आहे घटणा आणि दलीत पैंथर संघटणे कडुण दिपक केदार यांच्या कडुण काय इशारा देण्यात आला आहे ? 👇
बीड अंबाजोगाई पोलीस पुढील दोन तासात हे सगळे अटक केले पाहिजेत.
होलार समाजाचा अनुसूचित जातीचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला.
गुन्हा घेण्यास पोलीसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे. ऍट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा का नोंद केला नाही?
बीड पोलिस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी. सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावेत. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे. तात्काळ आरोपीना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे.
व्हिडीओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार वाढले आहेत त्या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करतंय का? यामागे पोलीसांना, पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्धा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करतंय का याची सखोल चौकशी करावी.
राज्य सरकारने गंभीर्याने दखल घ्यावी. मुख्यमंत्री गृहमंत्री सपसेल फेल झालेले आहेत. त्यांच्या कारकीर्तीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाहीत त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहे!

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.