
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी -केशव डी मुंडे
बीड, सोलापुर सह अ.नगर जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई मुळे बीडच्या गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ..
बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या कडुण संगठीत गुन्हेगारी विरोधातील मोठी कारवाई –
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अवादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत यांनी शथीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मपोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बोड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवुन नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत.
दिनांक 17/01/2025 रोजी फिर्यादी नामे चिब्बा आजिनाथ भोसले वय 30 वर्षे रा. हतोळण ता. आष्टी जि. बीड यांनी फिर्याद दिली की, दिनांक 16/01/2025 रोजी 17.00 ते 21.00 वा.सु. माझा दिर कृष्णा विलास भोसले हा मोहटादेवी येथे दर्शन घेण्यासाठी मित्रासोवत गेला होता त्याने फोन करुन कळविले की,
मी दर्शनासाठी जात असतांना वाहीरा येथील गोरख भोसले याचे वस्तीजवळ सुरेश ईश्वर भोसले व इतरांनी मला शिवीगाळ व मारहाण केली आहे असे सांगितल्याने सदरची माहीती मी माझे पती अजिनाथ विलास भोसले यांना सांगितली,
त्यानंतर माझे पती आजिनाथ व दिर भरत भोसले असे मोटरसायकल वर दुसरा दिर कृष्णा यास पाहण्यासाठी गेले परंतु ते परत आलेच नाहीत
त्यानंतर मी माझी सासू, सवत व जाऊ शिवाणी असे आम्ही पिकअप मध्ये बसून वाहीरा येथे गेलो. तेंव्हा तेथे वाहीरा ते पिंपळगांव जाणारे डांबरी रोड लगत गावराण जागेत माझा दिर भरत विलास भोसले हा रक्तबंबाळ आवस्थेत पडलेला दिसला तो काही एक बोलत नव्हता रोडच्या बाजूस अजिनाथ विलास भोसले जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्याचे शरीराची काहीच हालचाल नव्हती, जवळच कृष्णा हा देखील बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला त्याचे डोक्यातुन रक्त वाहत होते.
तेंव्हा त्याने आम्हाला सांगितले की, गोरख नारायण भोसले व इतर 09 जनांनी संगणमत करुन जुन्याभाडणाचा राग मनात धरुन आम्हांला काठी, कुन्हाड, चाकु, लॉखडी पाईपने मारहाण केली आहे, त्यांना उपचार कामी दवाखण्यात घेऊन गेलोत त्यावेळ डॉक्टरांनी सांगीतले की,
माझा नवरा अजिनाथ विलास भोसले व दिर भरत विलास भोसले हे दोघे मरण पावले आहेत तसेच कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झालेला आहे वगैरे मजकुराचे फिर्याद वरुन पो.स्टे. अंभोरा येथे गुरनं 31/2025 कलम 103(1),109, 189(2),190,191(3) भा.न्या.सं. अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री. मंगेश साळवे पो.स्टे. अंभोरा हे करीत आहेत.
सदर गुन्हयाच्या तपासात अंभोरा पोलीसांनी आरोपीचा बाराकाईने शोध घेऊन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी टोळी प्रमुख नामे दिपक ऊर्फ सलीम नारायण भोसले वय 35 वर्षे रा. वाहीरा ता. आष्टी जि. बीड या दिनांक 21.01.2025 रोजी 23.03 वा. अटक केली.
तसेच गुन्हयातील इतर 05 नामे 1. सोमीनाच ऊर्फ नाज्या दिलीप काळे वय 35 वर्षे रा. पु. पिंपरी 2. मुद्दसर मन्सुर पठाण वय 38 रा. कानडी खुर्द 3. सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले वय 40 रा. बाहीरा 4. शशिकला दिपक भोसले वय 35 रा. वाहीरा 5. संध्या कोहीनूर भोसले वय 21 रा. वाहीरा यांना दि. 17.01.2025 रोजी 17.54 वा. अटक केलेली आहे पैकी 03 आरोपी फरार आहेत.
सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या बीड, सोलापुर व अ.नगर जिल्ह्यात एकुण 13 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरीचोरी करणे, अवैधशस्त्र बाळगणे, पुरावा नष्ट करणे, रस्ता आडविणे, मारहाण करणे, शिवीगाळ करुन धाकदपटशाह दाखवणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत, प्रस्तावात एकुण 13 गुन्हे विचारात घेण्यात आले.
त्यापैकी 12 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असुन 01 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असुन 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत.
सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आर्थीक फायदयासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतून लपून राहीले नाही.
त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी सपोनि मंगेश साळवे, पो.स्टे. अंभोरा यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड व उपविपोअ आष्टी यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 10/03/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता.
पोलीस अधिक्षक, श्री नवनीत काँवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 11/03/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.
मा. श्री. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 19/03/2025 रोजी नमूद संदभीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने
पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. बाळकृष्ण हानपुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1) (i), 3(2),3(4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे.
त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत 06 आरोपी अटक असून 03 फरार आहेत बीड पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री मंगेश साळवे, मुकेश एकशिंगे, केदार पो.स्टे. अंभोरा तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बीड यांनी केली आहे.
भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळवावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित काँवत यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षक, बीड यांचे कडुण 👇प्रति,संपादक,वेगवान मराठी बीड करीता

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.