
शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन अभिलेखावरील सराईत गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई
वेगवान मराठी नेटवर्क प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड- दिनांक 22 मार्च 2025 –शिवाजीनगर पोलीस ठाणे अभिलेखावर शरिराविरुध्द व अवैध रित्या घातक शस्त्र बाळगने प्रकरणी एकुण 06 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार नामे राहुल प्रकाश तुपे वय 27 वर्षे रा. शिरापुर ता. जि. बीड ह. मु. गोविंद नगर, बीड
हा धोकादायक व सराईत गुन्हेगार असल्याने त्याला बीड जिल्ह्या सिमा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणेकामी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. एम. बी. खेडकर, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड यांनी हद्दपार प्रस्ताव तयार करुन सदरचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांचे मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, उपविभाग बीड यांना सादर केलेला होता.
सदर प्रस्तावा वरुन मा. कविता जाधव मॅडम, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग बीड यांनी सराईत गुन्हेगार नामे राहुल प्रकाश तुपे वय 27 वर्षे रा. शिरापुर ता.जि.बीड ह.मु. गोविंद नगर, बीड यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) प्रमाणे बीड जिल्हा सिमा हद्दीतुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे इसम नामे राहुल प्रकाश तुपे वय 27 वर्षे रा.शिरापुर ता. जि.बीड ह.मु. गोविंद नगर, बीड हा
आज दिनांक 22/03/2025 रोजी वाशी पोलीस ठाणे जि. धाराशिव हद्दीत राहणारे त्याचे नातेवाईक मावस भाऊ नामे विकास विलास क्षिरसागर यांचेकडे राहणेस गेलेला आहे.
सदर इसमास एक वर्षाकरीता पुर्व परवानगी शिवाय बीड जिल्हा हद्दीत येण्यास मनाई आहे. सदरचा इसम बीड जिल्हा हद्दीत दिसुन आल्यास नजीकच्या पोलीस ठाणेला माहिती द्यावी,
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वंभर गोल्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. मारोती खेडकर, पोह/2130 परजने, पोह/1664 आघाव, पोह/1611 गाडे, पोअं./485 कांदे, पोअं/983 सारणीकर, पोअं. 2221 बहिरवाळ यांनी केलेली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.