
शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन अभिलेखावरील सराईत गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड- दि.30 मार्च 2025 शिवाजीनगर पोलीस ठाणे अभिलेखावर मोटार सायकल चोरी, वाळु चोरी, वेश्या व्यवसाय चालवणे प्रकरणी एकुण 04 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार नामे राम लक्ष्मण लांडगे वय 26 वर्षे रा. गोवींद नगर, धानोरा रोड, बीड हा धोकादायक व सराईत गुन्हेगार असल्याने त्याला बीड जिल्ह्या सिमा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणेकामी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)(अ) प्रमाणे
पोलीस निरीक्षक श्री. एम. बी. खेडकर, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड यांनी हद्दपार प्रस्ताव तयार करुन सदरचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांचे मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, उपविभाग बीड यांना सादर केलेला होता.
सदर प्रस्तावा वरुन मा. कविता जाधव मॅडम, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग बीड यांनी सराईत गुन्हेगार नामे राम लक्ष्मण लांडगे वय 26 वर्षे रा. गोवींद नगर, धानोरा रोड, बीड यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) प्रमाणे बीड जिल्हा सिमा हद्दीतुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे इसम नामे राम लक्ष्मण लांडगे वय 26 वर्षे रा. गोवींद नगर, धानोरा रोड, बीड हा दिनांक 29/03/2025 रोजी गोंदी पोलीस ठाणे जि. जालना हद्दीत राहणारे त्याचे नातेवाईक सुरेश सुभाष जगताप रा. शहागड ता.अंबड जि. जालना यांचेकडे राहणेस गेलेला आहे.
सदर इसमास एक वर्षाकरीता पुर्व परवानगी शिवाय बीड जिल्हा हद्दीत येण्यास मनाई आहे. सदरचा इसम बीड जिल्हा हद्दीत दिसुन आल्यास नजीकच्या पोलीस ठाणेला माहिती द्यावी,
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वंभर गोल्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली
शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. मारोती खेडकर, पोह/2130 परजने, पोह/1664 आघाव, पोह/1817 नाटकर, पोअं./983 सारणीकर यांनी केलेली आहे.
आणखी एका वेश्यालय चालवणाऱ्या प्रकरणात आरोपी सुनिल वाघमारे व शेख अख्तर यांना अटक करुण न्यायालयात हजर करण्यात आले
शिवाजीनगर पोलीसांची वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई
दिनांक 29/03/2025 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड हद्दीत यशंवतराव चव्हाण नाट्यगृहा जवळील पत्र्याच्या शेडच्या रुममध्ये दोन इसम वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांना मिळाल्यावरुन त्यांनी सदरची माहीती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वंभर गोल्डे यांना दिली असता त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील पथकानेछापा मारुन वेश्या व्यवसाय चालवणारे आरोपी १.
विशाल सुनिल वाघमारे वय २९ वर्षे, रा. अशोक नगर, बार्शी नाका, बीड, २. शेख अख्तर ऊर्फ सलीम शेख महेमुद वय ४६ वर्षे, रा. इंदीरा नगर, नाटयगृहा जवळ, बीड यांना जागीच पकडुन छत्रपती संभाजीनगर येथील 02 पिडीत महीलांची सुटका केली असुन आरोपी यांना अटक करुन आज
रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 02/04/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविपोअ विश्वंबर गोल्डे यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. विलास मोरे, महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती निता दामधर, पोलीस हवालदार गणेश परजने, पोलीस शिपाई भरत शेळके, महीला पोलीस शिपाई विशाखा वडमारे यांनी केली आहे.
वेगवान मराठी नेटवर्क बीड -केशव डी मुंडे जाहिराती साठी संपर्क 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.