
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डी मुंडे दि 31 मार्च 2025 सोमवार – मस्साजोग प्रकरणातील धग विझण्या आगोदरच कानापुर येथे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची पुनर्वावृत्ती झाली आहे या घटणेत देखील मृत व्यक्ती देशमुखच आहे आणि हत्या करणारा देखील देशमुखच आहे, योगायोग आसा आहे की या घटणेतील आरोपीचे नाव संतोष देशमुख आसुण मयत पावलेला व्यकती स्वपन्नील देशमुख आहे
याविषयी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देशमुख याचा भाऊ अविनाश देशमुख याने आताच्या घटणेतील मृत व्यक्ती स्वप्नील देशमुख याच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी स्वप्नील देशमुखवर परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता.
सदरील गुन्हा पाठीमागे घेण्याच्या कारणावरून मयत स्वप्नील देशमुख व आरोपी संतोष देशमुख यांच्यात वाद होत होते.असाच वाद काल देखील झाला आणी यातूनच स्वप्निल देशमुखची हत्या करण्यात आली.
चिमटा डोक्यात घालून व दगडाने ठेचून निघृण हत्या केली गेली आहे मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्हापूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
जुन्या वादातून 27 वर्षीय स्वप्नील देशमुख या तरुणावर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख या दोघांनी मिळुण स्वपन्नील देशमुख यांच्या डोक्यात कापूस उपटण्याचा चिमटा घातला, आणि नंतर दगडाने ठेचून त्याची निघृणपने हत्या केली.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी संतोष देशमुखसह दोघांना ताब्यात घेतले आसुण या घटणेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
वेगवान मराठी नेटवर्क बीड -केशव डी मुंडे -संपर्क 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.